AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंतरवालीहून परतताना मराठा आंदोलकाचा मृत्यू, उभ्या ट्रकला कारची धडक

मराठा आंदोलक आंदोलन संपल्यानंतर घरी परतत असताना बीड येथे त्यांचा अपघात झाला. परतीच्या प्रवासादरम्यान आंदोलकांच्या चारचाकी वाहनाने एका उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

अंतरवालीहून परतताना मराठा आंदोलकाचा मृत्यू, उभ्या ट्रकला कारची धडक
Manoj JarangeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 31, 2026 | 1:35 PM
Share

काल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोष पुकारले होते. अंतरवाली येथील एका शेतात रखरखत्या उन्हात बाज टाकून जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली. अनेक मराठा आंदोलक अंतरवालीमध्ये दाखल झाली होते. मात्र, मध्यरात्री मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्यानंतर उपोषणाला स्थगिती दिली. त्यानंतर आंदोलन संपवून अंतरवाली सराटी येथून इंदापूरकडे परत जात असताना एका आंदोलकाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू

मराठा आंदोलक आंदोलन संपल्यानंतर घरी परतत असताना बीड येथे त्यांचा अपघात झाला. परतीच्या प्रवासादरम्यान आंदोलकांच्या चारचाकी वाहनाने एका उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात इंदापूरमधील मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बीड जवळील मांजरसुंबा परिसरात घडला आहे.

दोघेजण गंभीर जखमी

इंदापूर तालुक्यातील रामचंद्र शंकर जमदाडे हे आपले सहकारी संतोष माने आणि बिपीन मोरे यांच्यासोबत अंतरवाली सराटी येथून रात्री उशिरा कारने घरी परतत होते. त्यावेळी बीडमधील मांजरसुंबा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये रामचंद्र जमदाडे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचे इतर दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच बीडमधील स्थानिक मराठा समन्वयकांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी दोन्ही जखमी कार्यकर्त्यांना बीडच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारीही या समन्वयकांनी स्वतःवर घेतली आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा