AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gunaratna sadavarte | ‘रोहित पवार आणि संजय राऊत या चाटूंना…’ गुणरत्ने सदावर्ते यांची जीभ घसरली

Gunaratna sadavarte | गुणरत्ने सदावर्ते यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना अचानक जीभ घसरली. रोहित पवार आणि संजय राऊत यांच्याबद्दल ते वादग्रस्त बोलले. ओबीसी, खुल्यावर्गातील तुमच्या अधिकाराच रक्षक म्हणून मी आहे, टेन्शन घेऊ नका असही ते म्हणाले.

Gunaratna sadavarte | 'रोहित पवार आणि संजय राऊत या चाटूंना...' गुणरत्ने सदावर्ते यांची जीभ घसरली
Gunaratna sadavarte controversial statement
| Updated on: Jan 27, 2024 | 2:01 PM
Share

Manoj jarange patil | “खुल्या वर्गातील जैन, वैश्य आणि ब्राह्मणांच्या अधिकारातल्या जागा शाबूत ठेवणं. त्यांच्यावर कुठलीही गदा येऊ न देणं ही माझी जबाबदारी आहे. जे खरे मागास आहेत, लोहार भाऊ, तळपत्या उन्हाता काम करणारा वडार भाऊ, सुतार भाऊ असेल, जे वेगवेगळे जात समूह कष्टाच्या आधारावर सामाजिक मागास आहेत, त्यांच्या जागा, त्यांची गुणवत्ता विशिष्ट स्तरावर आणण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच जे संविधान आहे, त्यानुसार या घटकाच्या अधिकाराच्या रक्षणाची माझी जबाबदारी आहे” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

“माझ्या मराठा भावांना EWS च्या लाभापासून वंचित ठेवण्यासाठी उभारलेलं हे आंदोलन होतं, असं मी समजतो. ते नोटीफिकेशन म्हणजे नोटीस आहे. उच्च न्यायालयात मागास आयोगापासून काय-काय चालू आहे, ते सांगण्यासाठी. त्या अधिकाराच्या रक्षणासाठी न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

‘त्या चाटूंना बोलण्याचा अधिकार नाही’

ते नोटीफिकेशन नाही, नोटीस आहे तुम्ही म्हणताय, मराठ्यांच्या तोंडाला पान पुसली असं तुम्हाला म्हणायच आहे का? या प्रश्नावर सदावर्ते यांनी अचानक रोहित पवार आणि संजय राऊत यांच नाव घेतलं व बोलताना त्यांची जीभ घसरली. “तो रोहित पवार आणि संजय राऊत यांनी स्वत:ची जागा तपासावी. माझ्यावर टीका करणाऱ्या त्या चाटूंना बोलण्याचा अधिकार नाही” असं म्हणाले.

‘टेन्शन घेऊ नका’

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाची दिशाभूल करतायत असा आरोप त्यांनी केला. “मी स्वत: उपोषण केलय, किती विक झालोय हे सांगायची गरज नाही. खजूर, दूध हे लक्षात घेता वेगवेगळे स्टंट असतात, पॉलिटिकल स्टंट” अशी टीका त्यांनी केली. “ओबीसी, खुल्यावर्गातील तुमच्या अधिकाराच रक्षक म्हणून मी आहे, टेन्शन घेऊ नका” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट