Manoj Jarnage Patil : देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील ते तीन आवाज कोणाचे? मनोज जरांगे पाटील यांनी दिलं उत्तर
Manoj Jarnage Patil : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ऑडिओ क्लिप पत्रकारांना ऐकवली. त्यात दोन पुरुषांचा आणि एका महिलेचा संवाद आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ऑडिओ क्लिप पत्रकारांना ऐकवली. त्यात दोन पुरुषांचा आणि एका महिलेचा संवाद आहे. राजकारणाची दिशा कशी ठरवायची? कधी काय करायचं? कसं मॅनेज करायचं? असं सगळं या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. ही सगळी ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना ती माणसं कोण? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “ती लोक कोण आहेत, ते फडणवीस आणि शिंदे साहेबांनी शोधायचं आहे. ते गरीबांना जेलमध्ये टाकतात. सत्तेवर आहात तुम्ही, हे तुमचं काम आहे शोधायचं” असं मनोज जरांगे पाटील बोलले.
“आमच्यासमोर दिसणारं सत्य आम्ही राज्यातील जनतेसमोर ठेवलं आहे. डोळे उघडतील असं हे सत्य आहे. कशा प्रकारचे आरोप आहेत. स्टेटमेंट ऐका, किती मोठं षडयंत्र आहे. माझे लोक फोडायचे त्याची कबुली द्यायची. हे पक्षाच नेटवर्क चालवणारे लोक आहेत असं मला वाटतं. देश, राज्याचं नेटवर्क चालवणारे, रणनिती ठरवणारे हे लोक असावेत. यांनी ठरवायचं, बाकीच्यांना करायचं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
घराच्या बाहेर कसं पडायचं आम्ही
“आमच्यासारख्या गरीबांच्या पोरांचं किती अवघड आहे. 6 कोटी मराठा समाज आशा लावून बसलाय मोठं व्हायची. आमच्याविरोधात षडयंत्र रचलं जात असेल तर कसं जगायचं?. आम्ही हात टाकलाय तुमच्यापुढे सत्य मांडण्यासाठी. यासाठी राज्याचे आभार मानले पाहिजेत. घराच्या बाहेर कसं पडायचं आम्ही, ते उद्या आम्हाला मारुन टाकतील” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “आम्ही सावध राहू. सापळा रचतायत,पाचशे कोटी दिले बोलतात. शोधून काढलं पाहिजे. कोण आहेत ती माणसं. शिंदेसाहेब म्हणल्याशिवाय ते म्हणले का?.तू का म्हणली?” असं जरांगे पाटील बोलले.
फडणवीसाहेब तुम्ही शोधून काढलं पाहिजे
“तू बदनामी केली राव आमची. हा अराजकता माजवण्याचा प्रयत्न आहे. फडणवीसाहेब तुम्ही शोधून काढलं पाहिजे, नाहीतर तुमचा हात आहे असं मी म्हणीन. तुम्ही त्यांना काळ्या पाण्यापर्यंत नेलं पाहिजे. खोट्यानाट्या टीम तयार करतात, बातम्या देतात. फडणवीस साहेब अशा लोकांचा तुम्ही छडा लावला पाहिजे. नाहीतर, 2029 मध्ये मी तुमचा एकबी माणूस निवडून येऊ देणार नाही” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
(बातमी अपडेट होत आहे)
