मनोज जरंगे यांच्या आंदोलनाबाबत अंतिम तोडगा, अधिसूचना निघणार

maratha reservation issue : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरु आहे. मराठा समाजातील कुणबी नोंदणी असणाऱ्या सर्वांना आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ती मान्य होणार आहे.

मनोज जरंगे यांच्या आंदोलनाबाबत अंतिम तोडगा, अधिसूचना निघणार
maratha reservation
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 18, 2024 | 8:27 AM

दत्ता कनवटे, जालना, दि.18 जानेवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे सुरु झालेले आंदोलन संपण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी गेल्या चार-पाच महिन्यांपासून आंदोलन सुरु केले आहे. मराठा समाजातील कुणबी नोंदणी असणाऱ्या सर्वांना आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. राज्य सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सकाळी 11 नंतर राज्य सरकारचा शिष्टमंडळ जरांगे यांची घेणार भेट घेऊन त्यांना ड्रॉफ्ट दाखवणार आहे. त्यानंतर अधिसूचना निघणार आहे.

मुंबईकडे निघण्यापूर्वी तोडगा

मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. कुणबी नोंदणीसाठी सगेसोरये हा शब्द टाकण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली. त्यासाठी २६ जानेवारीपासून मुंबईत उपोषण सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला. मुंबईत येण्यासाठी २० जानेवारी रोजी ते अंतरवली सराटी येथून निघणार आहे. त्याच्या या यात्रेचा पाच ठिकाणी मुक्कामाचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला. त्यानंतर २६ जानेवारी रोजी मुंबईत पोहचणार आहेत. त्यांच्यांसोबत लाखो मराठा बांधव मुंबईत येण्याची शक्यता आहे. यामुळे त्यापूर्वी तोडगा काढण्यासाठी हालचाली राज्य सरकारकडून सुरु करण्यात आला. गुरुवारी राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.

लागलीच अधिसूचना काढणार

राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरंगे यांची भेट घेऊन त्यांना ड्रॉफ्ट दाखवणार आहे. यामुळे या आंदोलनाबाबत आज अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या मागण्याप्रमाणे राज्य सरकार अधिसूचना काढण्याची शक्यता आहे. मनोज जरंगे यांनी सुचवलेल्या दुरुस्त्यांसह अधिसूचना काढण्यात येणार असल्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन संपणार असल्याची शक्यता आहे. जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बच्चू कडू यांनी घेतली भेट

मनोज जरांगे पाटील यांची आमदार बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. त्यांच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकारशी चर्चा करण्याचे सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास आपण स्वत: आंदोलनात सहभागी होऊ, असेही बच्चू  कडू यांनी सांगितले.