Manoj Jarange Patil | आरक्षण मिळाले तरी मुंबईला जाणारच, मनोज जरांगे पाटील इतके इरेला का पेटले?

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला येऊ नये, यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे यांची भेट घेण्यात आली. पण सगे सॊयरे शब्दावरुन सगळ अडलं आहे. त्यावर तोडगा निघण गरजेच आहे.

Manoj Jarange Patil | आरक्षण मिळाले तरी मुंबईला जाणारच, मनोज जरांगे पाटील इतके इरेला का पेटले?
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 11:51 AM

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील हे मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. येत्या 20 जानेवारीला ते जालना अंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईत येऊन ते आंदोलनाला बसणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी जे मुद्दे मांडलेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी मांडलेल्या मुद्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही समाधान झालेलं नाही. सोयरे या शब्दावरुन सगळ अडलं आहे. “सोयरे संदर्भात आम्ही दोन महिने झाले, व्याख्या देतोय पण ते फक्त त्यामधील एक शब्द घेतात. व्याख्येसह सगे सोयरे शब्द घेतला पाहिजे” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

“ज्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजे आणि हे प्रमाणपत्र मराठ्यांजवळ असेल, तरच त्या सग्या सोयऱ्याला शब्दाला किंमत आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मुंबईला जातांना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी आणि जेवणाचे स्टॉल लावा. ज्यांची नोंद सापडली त्या नोंदीचा आधार घेऊनच, ज्या ठिकाणी आपली लग्न सोयरीक जुळते ते सगे सॊयरे आणि त्या सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे” अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी काय ठणकावून सांगितलं?

“सर्व सग्या सोयऱ्यांना शब्द वापरून ज्याची नोंद सापडली त्या बांधवांचा आधार घेऊन, ज्याची नोंद सापडली नाही, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्राचा लाभ देण्यात यावा ही व्याख्या घेणे आवश्यक आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मराठा समाजाला आवाहन आहे, की मुंबईला जाताना रॅली मध्ये शांतपणे यावे आणि ज्यांना स्वयंसेवक व्हायचे आहे, त्यांनी 20 जानेवारीला अंतरवालीला यायचे आहे. 20 जानेवारी बद्दल कुणालाही शंका असण्याचे कारण नाही. आरक्षण मिळाले, तरी मुंबई जाणार आहोत आणि नाही मिळाले तरी मुंबईला जाणार आहोत. आरक्षण मिळाले तर गुलाल घेऊन जाऊ आणि नाही मिळाले तर आरक्षण आणायला जाऊ” असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.