Marathwada Mlc Election Result 2026 : महायुतीत असूनही शिंदेंच्या आमदाराची शरद पवारांच्या उमेदवाराला मदत, विजयानंतर प्रतापसिंह पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

"दुष्काळावर काम करायचं आहे खरीप गेलं, रब्बी गेलं आहे. जे पदवीधर आता मोठ्या शहरात पुढचं शिक्षण घेतात किंवा नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना होस्टेलला दोन आणि मेसला दोन हजार असे चार हजार रुपये तेरा महिने देण्यात यासाठी मी उद्या पत्र देणार आहे. बेरोजगारी आहे, पदवीधरांचे अनेक प्रश्न आहेत"

Marathwada Mlc Election Result 2026 : महायुतीत असूनही शिंदेंच्या आमदाराची शरद पवारांच्या उमेदवाराला मदत, विजयानंतर प्रतापसिंह पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
pratapsinh patil -Sharad Pawar
| Updated on: Oct 29, 2026 | 8:54 AM

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. या निवडणुकीत खऱ्या अर्थाने बाजी मारली ती शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील पदवीधरच्या दोन्ही जागा जिंकून प्रस्थापितांना धक्का दिला. छत्रपती संभाजीनगरमधील विजयानंतर शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही सरकारकडे विनंती करू नाहीतर रस्त्यावर उतरू” असा विजयी होताच प्रतापसिंह पाटील यांनी सरकारला इशारा दिला. “23 तारखेला आमचं परफेक्ट नियोजन झालं आणि 27 तारखेला करेक्ट कार्यक्रम झाला. अब्दुल सत्तार यांनी आम्हाला मदत केली. आम्ही त्यांचे आभार व्यक्त करायला जाऊ” असं प्रतापसिंह पाटील म्हणाले. “एखादा उमेदवार चांगलं काम करत असेल तर प्रत्येक जण सपोर्ट करतो” भाजप -दादाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मदत केली का? या प्रश्नावर प्रताप सिंह पाटील यांनी हे उत्तर दिलं.

“कमी वेळ मिळाला. मात्र पदवीधराने जो आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल आभारी आहे. 48 तास ही सगळी प्रक्रिया पार पडली.पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली. पुढील उमेदवार तिसरी टर्म 18 वर्षे झाले होते. महायुतीचे उमेदवार होते. पदवीधराला गेले 18 वर्षे गृहीत धरत होते. त्यांनी 23 तारखेला ताकद दाखवली. पदवीधराने लोकशाहीवर निष्ठा ठेवून मतदान केलं आहे. पहिल्या दिवसापासून आम्हाला कधीही आव्हान वाटलं नव्हतं. पहिल्या दिवसापासून आम्ही कॉन्फिडंट होतो. 23 तारखेपर्यंत आमचं परफेक्ट नियोजन झालं आणि 27 तारखेला करेक्ट कार्यक्रम झाला” असं प्रतापसिंह पाटील म्हणाले.

Loading...

शिंदे शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांचा पाठिंबा

“एखाद्या मतदारसंघात एखादा उमेदवार चांगले व्हिजन घेऊन त्या मतदारसंघात न्याय देत असेल तर, सपोर्ट घेण्यात काय हरकत आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांची मदत सपोर्ट घेतला. त्यांचं स्वागत केलं, आज निकाल लागला आहे. अब्दुल सत्तार यांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे जाणार आहे” असं प्रतापसिंह पाटील म्हणाले.

ही उमेदवारी मला पवार साहेबांनी दिली होती

“निवडणूकच ही जनतेने हातात घेतली होती. कारण मतदारांना गृहीत धरलं होतं. त्यामुळे अदृश्य शक्ती, पदवीधरांची नाराजी हे आम्हाला पहिल्या दिवसापासून लक्षात आलं. ही उमेदवारी मला पवार साहेबांनी दिली होती आणि पवार साहेब जेव्हा स्वतः उमेदवार देतात तेव्हा त्या मतदारसंघात उमेदवार विजयी होतो” असं प्रतापसिंह पाटील म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us