Nagpur Fire : नागपुरात स्टील इंडस्ट्रीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 5-6 गाड्या घटनास्थळी

नागपुरात स्टील इंडस्ट्रीला भीषण आग लागली आहे. आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या 5-6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

Nagpur Fire : नागपुरात स्टील इंडस्ट्रीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 5-6 गाड्या घटनास्थळी
Nagpur fire
| Updated on: Nov 01, 2026 | 8:50 AM

नागपुरातून मोठी बातमी हाती आली आहे. नागपुरातील वर्धमाननगर येथील स्टील इंडस्ट्रीला भीषण आग लागली आहे. नागपूर शहरातील वर्धमाननगर परिसरातील स्टील इंडस्ट्रीमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे.  या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या सुरुवातीला पोहोचल्या. या स्टील इंडस्ट्रीला नेमकी आग कशी लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु आगीच्या घटनेने आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील आग लागलेल्या कंपनीचं नाव आर टी ग्लोबल पार्क प्रभू स्टील असं आहे. या कंपनीत लॉजस्टिकचे काम व्हायचे. आगीची घटना घडल्यानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गर्दी पांगवण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5-6 गाड्यांनी पोहोचल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केले. ही छोटी इंडस्ट्री  आहे. त्यामुळे छोटे छोटे गोडाऊन या ठिकाणी आहेत.

Loading...

अनेक कामगारांचा जीव वाचला

नागपूरच्या (Nagpur Fire ) वर्धमाननगरमधील प्रभू स्टील चौकातील इंडस्ट्री गोडाऊनला ही आग लागली. वर्धमान नगर स्मॉल इंडस्ट्री एरिया आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे गोदाम असून त्याला भीषण आग लागली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. आज कंपनीत सुटीचा दिवस असल्याने गोदम बंद होते, त्यामुळे या ठिकाणी कोणीही नव्हते, अशी माहिती आहे. सात ते आठ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवत आहे. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात निघत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य या ठिकाणी आहे. आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या इंडस्ट्रीच्या आजूबाजूला काही घरे देखील आहेत. त्यामुळे स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अग्निशमन दलाला तातडीने माहिती दिली. सुरुवातीला काही स्थानिकांनी आग विझविण्यासाठी मदत केली. परंतु आगीचा भडका उडाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी मैदानात उतरले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us