AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैशांची नुसती मस्ती नाही तर माज, रावल कुटुंबाचा थेट साक्षीदाराच विकत घेण्याचा प्रकार, 8 वर्षाच्या लेकराला चिरडूनही..

मेघा रावल हिने अंश रविंद्र गुप्ता याला आपल्या गाडीखाली चिरडले. त्यानंतर खळबळ उडाली. थेट मोबाईलवर बोलण्याच्या नादात तिने 8 वर्षाच्या लेकराचा चिरडले. त्यातच आता धक्कादायक माहिती पुढे येतंय.

पैशांची नुसती मस्ती नाही तर माज, रावल कुटुंबाचा थेट साक्षीदाराच विकत घेण्याचा प्रकार, 8 वर्षाच्या लेकराला चिरडूनही..
Megha Rawal
| Updated on: Sep 01, 2026 | 1:05 PM
Share

मुंबईतील वांद्रे परिसरात घडलेल्या एका भीषण अपघाताने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आठ वर्षांचा अंश रविंद्र गुप्ता रविवारी दुपारी रस्ता ओलांडत असताना भरधाव इनोव्हा क्रिस्टाने त्याला धडक दिली. या धडकेत 8 वर्षाच्या लेकराचा जीव गेला. अंशचे वडील शेंगदाणे विकायचे. बलाढ्य श्रीमंत महिलेने अंशला धडक दिली. त्यात अंशचा जीव गेला. पोलिसांनी मेघा रावल या 44 वर्षीय महिलेला अटक केली. मात्र, त्यानंतर डोक्यात मुंगा जाणारा प्रकार उघडकीस आला. तिसरीत शिकणारा अंश रविवारी घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. वांद्रे इथल्या सेंट अँड्र्यू चर्चजवळील बागेच्या परिसरातून तो जात असताना अपघात झाला. महबूब स्टुडिओजवळील जॉन बॅप्टिस्ट रोडवर तो रस्ता ओलांडत असताना इनोव्हा क्रिस्टाने त्याला धडक दिली. नागरिकांनी तातडीने त्याला त्याच कारमधून होली फॅमिली रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

मेघा रावल या बलाढ्य श्रीमंत आहे. आता त्यांच्या कुटुंबियांनी नवा कारनामा केला. मेघा रावल गाडी चालवत असताना फोनवर बोलत होत्या, त्यावेळीच अंशला चिरडले. त्यातच आता रावल कुटुंबियांनी थेट मेघा रावल हिला वाचवण्यासाठी थेट साक्षीदाराला विकत घेण्याचा प्रयत्न केला. मेघा रावल ही फिटनेस कोच आहे. रावल कुटुंबिय बलाढ्य श्रीमंत आहेत. त्यामध्येच मेघाला वाचवण्यासाठी रावल कुटुंबियांनी थेट अपघाताचा साक्षीदार संदीप सिंह याला विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मेघा रावल हिच्या कुटुंबाकडून प्रत्यक्षदर्शी असलेल्या संदीप सिंह याला जबाब बदलण्यासाठी मोठी ऑफर देण्यात आली. संदीप सिंह याने त्याचा जबाब बदलावा, याकरिता मोठी प्रयत्न रावल कुटुंबाकडून केली जात आहेत. याबाबत खुलासा स्वत: संदीप सिंह याने केला. साक्षीदाराला विकत घेण्याचा प्रयत्न रावल कुटुंबाकडून करण्यात आला. आता पोलिस यांच्याविरोधात नक्की काय कारवाई करतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मेघा रावल हिची कार खूप जास्त वेगात होती.

मोबाईलवर ती बोलत होती. त्यामुळे अंश पुढे आला तरीही ती काहीच करू शकली नाही. त्यामुळे थेट कारने अंशला चिरडले. उद्या अंशचा वाढदिवस असताना कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातानंतर मेघा रावल हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आता मेघाला वाचवण्यासाठी थेट साक्षीदारालाच विकत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मेघा रावल हिच्याविरोधात कलम 105,281,125 भारतीय न्याय संहितेनुसार सहकलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे