माझ्या चुलत भावाचा मृत्यू डीजेमुळेच झाला, डीजेवर बंदी घालणे योग्य, मेघना बोर्डीकर यांची रोखठोक भूमिका!

मेघना बोर्डीकर आज धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी बोलताना त्यांनी डीजेबंदीवर भाष्य केले. तसेच सर्वांना न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले पाहिजे, अशी भूमिका घेतली.

माझ्या चुलत भावाचा मृत्यू डीजेमुळेच झाला, डीजेवर बंदी घालणे योग्य, मेघना बोर्डीकर यांची रोखठोक भूमिका!
meghna bordikar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 06, 2026 | 3:33 PM

Meghana Bordikar : पुण्यातील विद्यानंद बापट यांनी सार्वजनिक सण, उत्सवात डीजे, लाऊडस्पीकर लावू नये. न्यायालयाने दिलेल्या आदेसाचा भंग होत असेल तर डीजे वाजवणे, लाउडस्पीकर लावणे हे बलप्रयोगाने थांबवले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर पुणे, मुंबईसह राज्यभरात डीजेचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना डीजेबंदीचा मुद्दा चर्चेत आल्याने पुण्यात तर दोन गट पडले आहेत. एक गट डीजे, स्पीकर, ढोल-ताशांना पाठिंबा देतोय तर दुसरा गट ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेऊन डीजे बंद झाले पाहिजेत अशी भूमिका घेतोय. दरम्यान, आता याच डीजेबंदीवर भाजपाच्या नेत्या मेघना बोर्डीकर यांनी डीजे बंदीला पाठिंबा दिला आहे. सोबतच डीजेमुळेच गेल्या वर्षी माझ्या सख्ख्या चुलत भावाचा मृत्यू झाला, असे बोर्डीकर म्हणाल्या.

गणेशोत्सवात माझा सख्खा भाऊ

मेघना बोर्डीकर आज धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी बोलताना त्यांनी डीजेबंदीवर भाष्य केले. तसेच सर्वांना न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले पाहिजे, अशी भूमिका घेतली. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात माझा सख्खा भाऊ फक्त डीजेमुळे मृत्युमुखी पडला. आपण वारंवार सांगतो की सर्वोच्च न्यायालायनेही डीजेवर बंदी घातली आहे. परंतु लोकांना ते मान्य नाही. डीजेमुळे घातक परिणाम होऊ शकतात, हे आपण सगळ्यांनी अनुभवले आहे, असे मत बोर्डीकर यांनी व्यक्त केले.

सण साजरे करा पण…

तसेच, डीजेबर बंदी घालणे हे योग्य आहे. डीजे वाजवायला नको. आपण सगळे सण, उत्सव साजरे केले पाहिजेत. परंतु त्यापासून त्रास व्हायला नको, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असंही पुढे मेघना बोर्डीकर म्हणाल्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अप्रत्यक्षपणे डीजे लावू नये. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असेच आवाहन जनतेला केले आहे. पुण्याचे लोक सुजाण आहेत. ते आपली परंपरा जपूनच गणेशोत्सव साजरा करतील, असं फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे आता जनता डीजे बंदी तसेच ध्वनिक्षेपकाच्या बंदीला कसा प्रतिसाद देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us