AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पेट्रोलचे दर स्वत:च्या जबाबदारीवर पाहा, छातीत कळ आल्यास मालक जबाबदार नाही!’, पंपावरील मेसेज तुफान व्हायरल

इंधन दरवाढीबाबत काही लोकांची क्रिएटिव्हिटी चांगलीच समोर यायला लागली आहे. कोल्हापुरातील एका पेट्रोल पंपावरील अशीच एक क्रिएटिव्हिटी चांगलीच व्हायरल होत आहे.

'पेट्रोलचे दर स्वत:च्या जबाबदारीवर पाहा, छातीत कळ आल्यास मालक जबाबदार नाही!', पंपावरील मेसेज तुफान व्हायरल
sagar joshi
sagar joshi | Updated on: Feb 18, 2021 | 9:44 PM
Share

कोल्हापूर : सध्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक पुरता हैराण झालाय. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज वाढत आहेत. इंधन दरवाढीला यूपीए सरकार जबाबदार असल्याचा सूर पुन्हा एकदा भाजपनं आळवलाय. त्यावरुन काँग्रेस नेत्यांनीही भाजपवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. अशास्थितीत काही लोकांची क्रिएटिव्हिटी चांगलीच समोर यायला लागली आहे. कोल्हापुरातील एका पेट्रोल पंपावरील अशीच एक क्रिएटिव्हिटी चांगलीच व्हायरल होत आहे.(Message on fuel price hike at a petrol pump in Kolhapur)

‘पेट्रोलचे दर स्वत:च्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार राहणार नाही’, असा एक मेसेज कोल्हापुरातील एका पेट्रोल पंपावरील फलकावर लिहिण्यात आला होता. येणारा जाणारा प्रत्येक माणूस तो मेसेज पाहत होता आणि हसून पुढे जात होता. ग्राहकांसाठी लिहिलेल्या या खास मेसेजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. दरम्यान हा खोडसाळपणा पेट्रोल पंपावर नवीन कामाला आलेल्या कर्मचाऱ्याने केल्याचं स्पष्टीकरण संबंधित पंप मालकाने दिलं आहे. त्याच्या या मेसेजशी आम्ही सहमत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये (Petrol Diesel Price Today) सातत्याने वाढ होत आहे. ऐन महागाईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे वावही वाढत आहे. आजही देशातल्या अनेक भागांमध्ये शंभरच्या पार इंधन पोहोचलं आहे. आज पेट्रोल डिझेलच्या दरात 34 पैशांपेक्षा वाढलं आहे.

खरंतर, तेल कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. त्यानुसार आज सलग दहाव्या दिवशी ही वाढ झाली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये तर पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. दिल्लीत 34 पैसे वाढीसह 89.88 वर पोचलं तर मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 96.32 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच मेट्रो शहरांमध्ये इंधनाच्या किंमती वाढल्याचं पाहायला मिळालं आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 89.88 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 96.32 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 91.11 रुपये प्रति लिटर

पुणे (Pune Petrol Price Today) : 95.95 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 80.27 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 87.32 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 83.86 रुपये प्रति लिटर

पुणे (Pune Diesel Price Today) : 85.63 रुपये प्रति लिटर

संबंधित बातम्या :

परभणीत देशातील सर्वात महाग इंधन, पेट्रोल 98 रुपयांच्या पार, वाहनचालक त्रस्त

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीनं शंभरी गाठली, पुण्यात काँग्रेसचं मोदी सरकारविरोधात आंदोलन

Message on fuel price hike at a petrol pump in Kolhapur

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...