पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीनं शंभरी गाठली, पुण्यात काँग्रेसचं मोदी सरकारविरोधात आंदोलन

देशात वाढत चाललेल्या इंधन किमतीच्या विरोधात पुण्यातील सातारा रोडवरील भापकर पेट्रोलपंपाच्या बाहेर युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्यावतीनं मोदी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीनं शंभरी गाठली, पुण्यात काँग्रेसचं मोदी सरकारविरोधात आंदोलन
Pune Youth Congress Protest

पुणे : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीनं शंभरी गाठली आहे. पुण्यातील (Congress Protest Against Modi Government) पेट्रोल पंपावर स्पीड पेट्रोल हे 98 रुपये तर साधं पेट्रोल हे 95.64 रुपये प्रती लिटरवर जाऊन पोहोचलं आहे. देशात वाढत चाललेल्या इंधन किमतीच्या विरोधात पुण्यातील सातारा रोडवरील भापकर पेट्रोलपंपाच्या बाहेर युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्यावतीनं मोदी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं (Congress Protest Against Modi Government).

यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत मोदी सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकार गरीबांच्या पैशावर डल्ला मारत आहे. दिवसेंदिवस वाढत्या इंधनाच्या किमतीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडत चाललं आहे.

मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरती नियंत्रण आणावं, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी काँग्रेसच्यावतीने देण्यात आलं. मोदी सरकारने गॅसची सब्सिडी बंद केली, म्हणून महिलांनीही जोरादार घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला.

पेट्रोलचे दर वाढतेच

पेट्रोलच्या किंमती वाढल्याने आज मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लीटर 95 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. दिल्लीत दिल्लीत पेट्रोल 89.29 रुपये/लीटर आणि डिझेल 79.70 रु./लीटर झालं आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 95.75 रुपये प्रति लीटर आणि डिझेलची किंमत 86.72 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचली आहे. विवध राज्यातील पेट्रोलियम उत्पादनांवरील व्हॅट आणि इतर शुल्काच्या वेगवेगळ्या दरांमुळे इंधनाचे दर वेगवेगळे असतात (Congress Protest Against Modi Government).

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 95.75 रुपये प्रतिलिटर

नाशिक (Nashik Petrol Price Today): 95.85 रुपये प्रतिलिटर

पुणे (Pune Petrol Price Today ): 95.63 रुपये प्रतिलिटर

नागपूर (Nagpur Petrol Price Today): 95.59 रुपये प्रतिलिटर

दिल्ली (Delhi Petrol Price Today): 89.29 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): लिटर 90.54 रुपये

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 91.52 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर

मुंबई (Mumbai Diesel Price Today): 86.72 रुपये प्रतिलिटर

नाशिक (Nashik Diesel Price Today): 85.49 रुपये प्रतिलिटर

पुणे (Pune Diesel Price Today): 85.30 रुपये प्रतिलिटर

नागपूर (Nagpur Diesel Price Today): 85.27 रुपये प्रतिलिटर

दिल्ली (Delhi Diesel Price Today): 79.70 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 83.29 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) 84.83 रुपये प्रतिलिटर

Congress Protest Against Modi Government

संबंधित बातम्या – 

Petrol Price Today : राज्यात आजही महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल महागलं, वाचा ताजे दर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI