संस्थाचालक शिक्षणकांना प्रचाराच्या कामाला लावत असतील तर… चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा इशारा..
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच संस्थाचालकांना मोठा इशारा दिला. हेच नाही तर एसआयटी चाैकशीची मागणी त्यांनी केली. मुलांच्या शिक्षणाशी खेळून जर शिक्षण संस्थाचालक शिक्षकांना प्रचाराला लावत असतील तर त्यांची एसआयटी चौकशी लावणार असल्याचे त्यांनी म्हटले.

भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच मोठे विधान केले. यासोबतच त्यांनी थेट इशाराही दिला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, पदवीधर आणि शिक्षक जागावाटपासंदर्भात मी भाष्य केले होते. आपलं सरकार मजुबत सरकार आहे. 288 पैकी 232 आमदार महायुतीचे आहे. निवडणुकीच्या काळात दिलेले आश्वासन आपण पुर्ण केले. निरोप समांरभात केलेले भाषणे पाहिले तर आपल्याला किरण सरनाईकांनी केलेल्या भाषणाची प्रचिती येईल… निश्चितपणे विदर्भामध्ये महायुती मजबुत आहे. आजही मुख्यमंत्री सुचना दिलेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपचा कुठलाही नेता महायुतीच्या विरोधात जाणार नाही. किरण सरनाईक निवडूण आले तर ते आपल्या महायुतीच्या नेत्यांकडेच कामे पुर्ण करुन घेण्यासाठी जातील. किरण सरनाईक जर निवडून आले तर दादा भुसेंकडून काम करुन घेतील. मुळ प्रश्न सोडवण्याची ताकद किरण सरनाईंकाकडे आहे.
आपण सर्वांनी काम केले पाहिजे. दुष्काळ निवारणासाठी जे जे काम करावे लागेल ते आपल्याला करावे लागणार आहे. जेवढी निवडणूक महत्वाची आहे. आपण शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. काँग्रेसवाले काल बोंबा मारत होते. कर्नाटकमध्ये एवढी मदत केली तर इथल्या सरकारला करायला काय अडचण आहे. काही राजकारणी लोक शिक्षण संस्थाचा उपयोग निवडणुकीसाठी करत आहेत.
मतदान करणे आपली जबाबदारी आहे. जर कुणी अशी धमकी देत असेल की आमच्या उमेदवाराला मतदान करा नाहीतर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकू…तर त्या संस्थेची मान्यता आम्ही रद्द करु….. महानगरपालिकेच्या शाळा प्रायव्हेट शाळांपेक्षाही चांगल्या करण्यासाठी प्रयत्न करु. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. थेट संस्थाचालकांना मोठा इशाराच बावनकुळे यांनी दिला.
किरण सरनाईक यांना अमरावती शिक्षक मतदार संघातील महायुतीची उमेदवारी दिली आहे. 23 तारखेची निवडणूक सरनाईक यांच्या नशिबाची नाही.. ही निवडणूक संकल्पपूर्ती कडे घेऊन जाणारी आहे. राज्यातील पाचही जागेवर महायुतीचे उमेदवार निवडून आले पाहिजे. शिक्षणाकरिता लढणारा खरा नेता म्हणून किरण सरनाईक यांच मी अभिनंदन करतो.…
विदर्भात दोन्ही ठिकाणी महायुती मजबूत आहे.. सगळे नेते काम करताना दिसत आहे… आजही मुख्यमंत्री यांनी सूचना दिल्या आहे की अमरावतीच्या मेळाव्यामध्ये जाताना सांगितले की, महायुतीच्या विरोधात कोणीही काम करणार नाही… एकदा निर्णय झाल्याच्या नंतर कोणीही विचार करणार नाही…शिक्षकांचे मूळ प्रश्न सोडवण्याची ताकद ही किरण सरनाईक यांच्यामध्ये आहे.. त्यामुळे त्यांना बहुमताने निवडून द्या…
मुलांच्या शिक्षणाशी खेळून जर शिक्षण संस्थाचालक शिक्षकांना प्रचाराला लावत असतील तर त्यांची एसआयटी चौकशी लावणार. राजकारणात अपवाद असत पसरवल्या जाते.. सांगतील की अनिल बोंडे बहिणीचा काम करत आहे.. राजेश वानखेडे मेहुणे यांचा काम करत आहे.. कोणीही गैरसमज करू नये कोणाचीही नार्कोटेस्ट करायची गरज नाही.. सगळे कार्यकर्ते मेहनतीने मजबुतीने काम करत आहे..
