AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तटकरेंचा तट तोडून आले… भरत गोगावले येताच छगन भुजबळांची टिप्पणी, थेट..

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी त्यांना मोठा धक्का देण्यात आला. भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. यादरम्यानच भरत गोगावले यांना पाहून छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले.

तटकरेंचा तट तोडून आले... भरत गोगावले येताच छगन भुजबळांची टिप्पणी, थेट..
Chhagan Bhujbal and Bharat Gogawale
| Updated on: Jun 08, 2026 | 1:43 PM
Share

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक होते. याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. यादरम्यानच त्यांनी राज्यसभेसाठी इच्छा दर्शवतानाच एक अटही ठेवली. आपले मंत्रीपद समीर भुजबळांना देण्यात यावे, ही त्यांची अट होती. मात्र, काही तास ताटकळत ठेवल्यानंतर भुजबळांना धक्का देत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांची उमेदवारी जाहीर केली. हा भुजबळांना मोठा राजकीय धक्का असल्याचे बोलले जाते. भुजबळ नाराज असल्याचे सांगितले जात होते. शेवटी राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता स्वत: प्रफुल्ल पटेल भुजबळांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले आणि छगन भुजबळ यांना घेऊन गेले. यादरम्यान काही वेळ दोघांमध्ये चर्चा देखील झाली. छगन भुजबळ यांनी आपल्या मनातील खदखद देखील बोलून दाखवली.

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ गाडीतून उतरताच राजेंद्र जैन यांनी असे काही केले की, उपस्थित लोक काही क्षणाकरिता आश्चर्यचकित झाले. राजेंद्र जैन यांनी खाली वाकून भुजबळांना नमस्कार केला. मलाही न्याय मिळाला, अशी भूमिका भुजबळांनी घेतली. यादरम्यानच आता छगन भुजबळ यांनी केलेली मिश्किल टिप्पणी चांगलीच चर्चेत आली.

तटकरेंचा तट तोडून आले म्हणत भरत गोगावले यांना पाहून भुजबळांनी टिप्पणी केली. भरत गोगावले यांना फोटोसाठी पुढे या म्हणण्यात आले. यावेळी भरत गोगावले पुढे येत असतानाच भुजबळांनी म्हटले की, तटकरेंचा तट तोडून आले.. भरत गोगावले यांनी म्हटले की होते, मी कधीही फोटोत न येणारा माणूस आहे तसा..

यावेळी भरत गोगावले हे तटकरेंच्या शेजारी उभा राहिल्याचे बघायला मिळाले. भुजबळांनी केलेली मिश्किल टिप्पणी ऐकून उपस्थित हसत होते. भरत गोगावले आणि तटकरे यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. उमेदवारी न  मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी म्हटले होते की, मकरंद पाटील मंत्री आहेत. त्यांचे भाऊ खासदार आहे. सुनेत्रा पवार मंत्री, पुत्र खासदार, तटकरे खासदार पुत्र आमदार. मलाही हा नियम लागू करण्याची विनंती केली.

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी