मोठी बातमी! गिरीश महाजन यांची विद्यार्थ्यांना थेट धमकी, गुन्हा दाखल झाल्यावर भरती..

मंत्री गिरीश महाजन पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी थेट धमकी दिली. या प्रकाराचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. गिरीश महाजन थेट विद्यार्थ्यांना धमकी देत आहेत.

मोठी बातमी! गिरीश महाजन यांची विद्यार्थ्यांना थेट धमकी, गुन्हा दाखल झाल्यावर भरती..
Girish Mahajan and students
| Updated on: Aug 04, 2026 | 2:58 PM

मंत्री गिरीश महाजन यांना संकटमोचक म्हटले जाते. मात्र, भाजपाचे हेच संकटमोचक मंत्री गेल्या काही दिवसांपासून संकटात दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन आणि आणि विजय चाैधरी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होताना दिसली. या ऑडिओ क्लिपनंतर मोठी खळबळ उडाली. थेट भाजपाच्याच महिला मंत्री रक्षा खडसे यांच्याबद्दल या ऑडिओ क्लिपमध्ये वादग्रस्त विधाने करण्यात आली. एवढेच काय तर शिवीगाळही करण्यात आला. एकनाथ खडसे यांच्याबद्दलही धक्कादायक विधाने करण्यात सुरू होती. खडसेंची सून रक्षा खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे यांच्याबद्दलही त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलण्यात आले. यादरम्यान अनेकांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली.

जळगावात पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातला. त्याचे कारणही मोठे आहे. मात्र, या तरुणांचे ऐकून घेण्याऐवजी गिरीश महाजन यांनी या तरुणांना थेट धमकी दिली. भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

जिल्हा क्रीडा संकुलात प्रवेश शुल्क दीडशेवरून थेट सहाशे रुपये केल्याने तरुण आक्रमक झाले. शुल्क कमी करून 300 रुपये करावे, अशी मागणी यादरम्यान त्यांनी केली. यावेळी मंत्री गिरीश महाजनांनी तरुणांना आंदोलनाची पद्धत चुकीची असल्याचे खडसावून सांगत नाराजी व्यक्त केली. गुन्हा दाखल झाल्यास पोलिस विभागात भरती होता येणार नाही या शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना सुनावले.

आंदोलक विद्यार्थ्यांना गिरीश महाजन यांनी थेट धमकी दिल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. थेट गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस विभागात भरती होता येत नाही, असे त्यांनी म्हटले. मंत्री गिरीश महाजन यांनी तरुणांशी मागण्यांसंदर्भात चर्चा केली आणि योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यावर तरुणांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, सुरूवातीला त्यांची थेट धमकीची भाषा होती.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us