AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking News : उद्या मंत्री माणिकराव कोकाटे घेणार पत्रकार परिषद, होणार मोठी घोषणा?

मोठी बातमी समोर येत आहे, कृषमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता, यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे, आता उद्या ते पत्रकार परिषद घेणार आहेत.

Breaking News : उद्या मंत्री माणिकराव कोकाटे घेणार पत्रकार परिषद, होणार मोठी घोषणा?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2025 | 8:01 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, कृषमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला, त्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता माणिकराव कोकाटे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ते काही मोठी घोषणा करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाट यांचा हा व्हिडीओ ट्विट केला होता, या व्हिडीओमुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारची कोंडी केली असून, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे.

दरम्यान हा व्हिडीओ समोर आल्यानंतर याचा निषेध करण्यासाठी छावा संघटनेकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यात आलं, यावेळी कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले, तसेच कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली, दरम्यान याचवेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याच्या प्रकार देखील घडला आहे. त्यामुळे आता छावा संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे.

उद्या सकाळी माणिकराव कोकाटे हे पत्रकार परिषद घेणार आहेत, राज्यात सध्या सुरू असलेल्या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये माणिकराव कोकाटे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

तटकरेंचं सूचक विधान 

दरम्यान रमीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, यावर तुमचं मत काय असा सवाल यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देताना त्यांनी  कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे आता कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष हे उद्याच्या पत्रकार परिषदेकडे लागलं आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट