AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण, पोलिसांकडून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला अटक

सोलापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईलने अपहरण झाले. अमित सुरवसे याने जुन्या वैमनस्याचा बदला घेण्यासाठी हे अपहरण केले होते. पोलिसांनी वेळीच कारवाई करून कार्यकर्त्याला वाचवले आणि 6 आरोपींना अटक केली.

गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण, पोलिसांकडून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला अटक
Gopichand Padalkar
| Updated on: Aug 08, 2025 | 8:03 AM
Share

सोलापूर शहरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईलने अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र, पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईमुळे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचा जीव वाचवण्यात यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अमित सुरवसेसह त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे. शरणु हांडे असे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हे अपहरण जुन्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 2021 मध्ये झालेल्या एका घटनेमुळे झाली. आरोपी अमित सुरवसेने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. काही दिवसांपूर्वी याच घटनेचा बदला घेण्यासाठी शरणु हांडे यांनी अमित सुरवसेला मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर दोन्ही गटांनी आपसातील वाद मिटवल्याचे सांगितले जात होते.

मात्र, अमित सुरवसेच्या मनात या मारहाणीचा आणि अपमानाचा राग कायम होता. याच रागातून त्याने शरणु हांडेचे अपहरण करून बदला घेण्याचा कट रचला. यासाठी त्याने पुण्यातून एक गाडी भाड्याने घेतली. त्यानंतर आपल्या मित्रांच्या मदतीने तो सोलापुरात आला. बुधवारी रात्री अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांनी शरणु हांडे याच्या घराजवळ गेले. यानंतर शरणु हांडे याला घरासमोरून शस्त्राचा धाक दाखवून गाडीत बसवले. त्याचे अपहरण केले. त्यानंतर हत्येच्या उद्देशाने ते त्याला घेऊन कर्नाटकच्या दिशेने निघाले होते.

पोलिसांकडून तात्काळ कारवाई

पण या अपहरणाची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 4 पथके तयार केली. पोलिसांनी कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मार्गांवर नाकाबंदी केली. रात्री 10 च्या सुमारास सोलापूर पोलिसांनी कर्नाटकच्या होर्टी गावाजवळ अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. अमित सुरवसे हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा समर्थक असल्याची माहिती समोर येत आहे.

अपहरण केल्याचा गुन्हा दाखल

यावेळी पोलिसांना शरणु हांडे हा गाडीत गंभीर जखमी अवस्थेत सापडला. पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी सोलापूरला आणले. ज्यामुळे त्याचे प्राण वाचले. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी अमित सुरवसेसह एकूण 6 जणांना अटक केली. त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

Follow Us
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार