AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray On MPSC Students : राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला, आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांना दिली गुड न्यूज

Raj Thackeray On MPSC Students : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात सुरु असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी काही आश्वासन दिली होती. त्या संदर्भात राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

Raj Thackeray On MPSC Students : राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला, आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांना दिली गुड न्यूज
Raj Thackeray On MPSC Students
| Updated on: Oct 09, 2026 | 11:15 AM
Share

सध्या पुण्यामध्ये MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. पेपर फुटीपासून या सर्व विषयाची सुरुवात झाली. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. महाराष्ट्रातील विविध नेते या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन आपपाली भूमिका मांडत आहेत. मंत्री नितेश राणे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. यांच्याप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती. 5 ऑक्टोंबरला राज ठाकरे तिथे गेले होते. त्यावेळी राज ठाकरेंनी MPSC विद्यार्थ्यांना आश्वसन दिलं होतं. त्याप्रमाणे राज ठाकरेंनी आपला शब्द पाळला आहे. आज राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करुन ही माहिती दिली.

“आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे” असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

मित्राला वाचवण्याचा आरोप

पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर MPSC विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार हे सातत्याने विवेक भीमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र असून मुख्यमंत्री मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप करतायत. पोलिसांनी एस.एम. जोशी पूल मोकळा करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. परंतु आमच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

Follow Us
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?