
“मला वाटतं केवळ मनसे असा असा एक पक्ष आहे, जो मराठी कलावंतांसाठी पुढाकार घेत त्यांच्या समस्या मांडण्यासाठी पुढे आला, इतर इतके दिग्गज मोठे पक्ष असून देखील त्यांना कधीही असं वाटलं नाही, मराठी कलावंतांसाठी काहीतरी करावं, यापुढे देखील आम्ही अशाच पद्धतीने मराठी कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. “मला केवळ एवढेच सांगायचे की पुतळा हा पोकळ कसा असू शकतो? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तरी भ्रष्टाचार करणे सरकारने थांबवलं पाहिजे” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
“त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. त्याला जवळपास साडेतीनशे वर्षे झाली आहेत, तो किल्ला अजूनही कोसळला नाही तो जसाच्या तसाच आहे. पण आपले पुतळे कोसळतात ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. “महाविकास आघाडी आता महायुती वरती टीका करतय, पण अस नाहीय की त्यांच्या काळामध्ये पुतळ्यासंदर्भात भ्रष्टाचार झालाच नाही, बलात्कार झालाच नाही, आता ज्ञान शिकवायला लागले. पण त्यांच्या काळातही तीच परिस्थिती होती त्यामुळे तराजूत जर दोघांना मोजलं तर दोघेही समानच आहेत” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
‘यातून सुटका नेमकी कधी होणार?’
“प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार होतोय. नाशिकचे रस्ते असू द्या तिथे लोक जायला धजावत नाहीत नाशिकहून मुंबईत यायचं झालं तर बारा बारा तास लागतात. लोक गाड्या पाठवून देतात पुढे आणि ट्रेनने स्वतः प्रवास करतात अशी अवस्था आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आम्ही आंदोलन केली पण अजूनही त्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पाहायला मिळतात यातून सुटका नेमकी कधी होणार?” असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे मालवणला जाणार का?
“राज ठाकरे कदाचित मालवणला जातीलही पण आता उपयोग काय? कारण पुतळाच त्या ठिकाणी पडलेला आहे आणि नवीन पुतळा बांधणार असं बोललं जातंय. त्यामुळे राज ठाकरे नेहमी सांगतात की पुतळे महाराष्ट्रात बांधण्यापेक्षा जे किल्ले महाराज यांनी बांधलेत, त्याचे संवर्धन झालं पाहिजे. त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे त्याचं जतन करा, पुतळा बांधत बसू नका” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.