AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणी युद्धनाैकेवर भारताच्या समुद्रहद्दीत हल्ला? या बड्या नेत्याचा दावा, थेट…

संजय राऊत यांनी नुकताच मोठे विधान केले. संजय राऊत यांनी इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यासोबतच त्यांनी म्हटले की, अमेरिकेने भारताच्या समुद्रहद्दीत येऊन इराणी जहाजावर हल्ला केला.

इराणी युद्धनाैकेवर भारताच्या समुद्रहद्दीत हल्ला? या बड्या नेत्याचा दावा, थेट...
Iranian warship attack
| Updated on: Mar 10, 2026 | 10:29 AM
Share

संजय राऊत यांनी नुकताच सरकारवर गंभीर आरोप केले. संजय राऊत यांनी म्हटले की, आजच्या परिस्थितीवर सरकारची भूमिका काय आहे?  सरकारला कोणत्याही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर संसदेत चर्चाच घडू द्यायची नाहीये. ही जी भीती आहे ती राहुल गांधी यांची भीती आहे. कारण राहुल गांधी यांच्याकडून भारताचे आंतरराष्ट्रीय धोरण, गुप्तचर तडजोरी याच्याबाबत त्यांच्या हातात अत्यंत महत्वाची माहिती आहे. राहुल गांधी जे बोलला, जे प्रश्न उपस्थित करतात, त्यावर भाजपाच्या सरकारकडे उत्तर देण्याची कोणतीही तयारी नसते. युद्ध भारताच्या सीमेवर आले आहे. अमेरिकेने भारताच्या सागरी हद्दीमध्ये हल्ला करून इराणीची जहाज बुडवली आहे आणि ज्यात 100 वर इराणी सैनिक मारलेले आहेत. स्वत: मोदी युद्धाच्या दोन दिवस अगोदर इस्त्रायलला जाऊन आले. इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधा शोकही व्यक्त केला नाही.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, मग तुम्ही शांततेच्या बाजूने कसे? जो इराण आपल्या वर्षानुवर्ष मित्र आहे, त्याचे सर्वाेच्च नेते मारले जातात आणि तुम्ही साधा शोकही व्यक्त करत नाहीत. मग ही तुमची कसली शांतता? ही षंड्यांची शांतता आहे. ऐरव्ही आमचे विश्वगुरू जगाला संदेश देत असतात ते आज शांत आहेत.

एपस्टीन फाईल हेच युद्धाचे मोठे कारण आहे. एपस्टीन फाईलनंतर काही लोकांनी युद्ध पुकारले तर काही लोकांनी माैनात जाणे पत्कारले. पत्रकारांनी नरेश मस्के यांच्याबद्दल प्रश्न विचारताच संजय राऊत यांनी म्हटले की, कोण आहेत नरेंद्र मस्के? मी त्यांना ओळखत नाही. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत.

त्या कॅबिनेटच्या सदस्य आहेत, त्यांनी या मुद्द्यात बोलले पाहिजे. देवेंद्र फडणवीस दादांच्या स्मारकाच्या गोष्टी करत आहेत. या रस्त्याला नाव देऊ… ते ठीक आहे. पण यापेक्षा महत्वाचे आहे की, त्यांचा मृत्यू संशयास्पद झाला, त्यावर बोलणे आणि माहिती देणे किंवा अहवाल येईल, त्यानंतर त्यावर बोलू हे त्यावरील उत्तर नाहीये, असे राऊतांनी म्हटले.

Follow Us
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना