रायगडमध्ये दोन विदेशी महिलांचा विनयभंग, दोघांना अटक

दक्षिण आफ्रिकेतील चिली शहरातून दोन पर्यटक महिला श्रीवर्धन येथे फिरण्यासाठी आल्या होत्या. या दोन्ही महिला संध्याकाळी फिरून हॉटेलजवळ जात असताना दोघांनी त्यांचा विनयभंग केला.

रायगडमध्ये दोन विदेशी महिलांचा विनयभंग, दोघांना अटक

रायगड : निर्सगरम्य वातावरण आणि समुद्रावर फिरण्यासाठी आलेल्या दोन परदेशी महिलांचा विनयभंग झाल्याची घटना श्रीवर्धन येथे घडली आहे. याबाबत पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोन पोलिसांना अटक केली आहे. रफिश दफेदार आणि महमद कैफ अशी दोन आरोपींची नावे आहे.

गुरुवारी 6 जूनला दक्षिण आफ्रिकेतील चिली शहरातून दोन पर्यटक महिला श्रीवर्धन येथे फिरण्यासाठी आली होती. या दोन्ही महिला संध्याकाळी फिरून हॉटेलजवळ जात होत्या. त्याचवेळी रफिश दफेदार आणि महमद कैफ या दोघांनी मोटारसायकलवरुन त्यांच्याशी असभ्य वर्तन करायला सुरुवात केली.

यानंतर या दोन्ही महिलांनी पोलिस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांनी या तक्रारीदरम्यान यातील एका विदेशी महिलेची नोंद पुणेकर अशी केली आहे. विशेष म्हणजे तिचा पत्ता चिली शहरातील असतानाही पोलिसांच्या नोंदणीमध्ये ती पुण्यातील राहणारी असल्याचं सांगण्यात येत आहे.

विदेशी महिलांचा पत्ता भारतीय महिला दाखवून आरोपीला कमी व सर्व सामान्य शिक्षा व्हावी, या दृष्टीने हे प्रकरण दडपण्यात येत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान या दोन्ही आरोपींवर कलम 354, 354 ड, 34 यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याची रवानगी कर्जतच्या बालसुधार गृहात करण्यात आली आहे. तर एका आरोपी पोलीस कोठडी ठोठवण्यात आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *