AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : कुठल्या गोधडीत मुतत होता? गांडूळ, संजय राऊतांचे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी लागणारे वार

"बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना गुढी पाडवा, अक्षय तृतीया, दसरा असे मुहूर्त पाहून केली नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा होईल तो साडेचारवा मुहूर्त असेल" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut :  कुठल्या गोधडीत मुतत होता? गांडूळ, संजय राऊतांचे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी लागणारे वार
Sanjay Raut
| Updated on: Oct 01, 2025 | 10:45 AM
Share

“दसऱ्याला दोनच मेळावे महत्वाचे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. इतर मेळाव्याला तुम्ही दसरा मेळावा म्हणत असाल, तर हा तुमचा प्रश्न आहे. या दोन्ही मेळाव्यांकडे देशातील जनतेच लक्ष लागलेलं असतं” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “चोर बाजारात माल विकायला असतो, दिल्लीतही चोर बाजार आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तिसरा चोर बाजार काढला आहे, तिथे त्यांनी राजकारणातला चोरीचा माल विकायला ठेवला आहे. त्याला जनता शिवसेना मानत नाही. एक निवडणूक आयोग आणि भाजप सोडले तर दुसरे लोक त्यांना शिवसेना मानत नाही. आतून मानावं लागतं” असं संजय राऊत म्हणाले.

“एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, प्रचंड पैशांचा वापर करुन लोक आणले जातील. अरे तुम्ही कोण? तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली? तुम्ही महाराष्ट्राला काय विचार दिला? हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा तुम्ही कुठे होता?. कुठल्या गोधडीत मुतत होता?. जर कोणाला वाटत असेल की, आम्ही शिवसेनेची स्थापना केली, तर जन्माचे दाखले घेऊन या. एक आरएसएस आणि दुसरा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा होणारा मेळावा हे सोडले, तर बाकीचे मेळावे होत असतात” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

‘एकनाथ शिंदेंचा पक्ष ही नरेंद्र मोदींची उपकंपनी, बेनामी कंपनी’

“सध्या एकनाथ शिंदे स्वत:ला बाळासाहेब ठाकरे समजतात. सकाळी उठताना बाळासाहेब ठाकरे म्हणून उठतात. बाळासाहेब सामान्यांचे पुढारी होते. बाळासाहेबांनी कधीच दिल्लीच्या चरणी आपला पक्ष, भूमिका अर्पण केल्या नाहीत. निर्णय कुठले घ्यायचे म्हणून कधीच नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या दारात उभे राहत नव्हते. एकनाथ शिंदेंचा पक्ष ही नरेंद्र मोदींची उपकंपनी, बेनामी कंपनी आहे. शिंदेंच्या पक्षाला मी पक्ष मानत नाही, पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात, पावसाळा संपला की नष्ट होतात तसे नरेंद्र मोदी, अमित शाह असेपर्यंत हे गांडूळ असतील, नंतर पावसाळ्यातील गांडूळाप्रमाणे नष्ट होतील. देशाच्या राजकारणात केलेली ही तात्पुरती व्यवस्था आहे. एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थैल्या अपर्ण करत राहतील, तो पर्यंत ते राहतील” अशी विखारी टीका संजय राऊत यांनी केली.

Follow Us
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी...
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन...
Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...