AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीमनवारांनंतर आता एमपीएससी आयोगातील कोणता कर्मचारी रडारवर? रोहित पवारांनी ट्विट करत थेट नावच सांगितलं; म्हणाले- ते मोठे खिलाडी…

MPSC Paper Leak Case: भीमनवारांनंतर एमपीएससी मधील आणखी एका व्यक्तीचा राजीनामा हवा आहे. रोहित पवारांनी थेट नाव घेत निशाणा साधला आहे.

भीमनवारांनंतर आता एमपीएससी आयोगातील कोणता कर्मचारी रडारवर? रोहित पवारांनी ट्विट करत थेट नावच सांगितलं; म्हणाले- ते मोठे खिलाडी...
| Updated on: Oct 16, 2026 | 8:49 PM
Share

एमपीएससीचा अध्यक्षपदाचा आतिरिक्त कार्यभार सतीश वाघोलेंकडे देण्यात आला आहे. एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार हे चौकशी होईपर्यंत सध्या रजेवर आहे. यामुळे आता सतीश वाघोले हे एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. तसेच एमपीएससीमधील तक्रारीची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. मुख्य सचिव राजेश अगरवाल यांच्याकडून अधिसूचना जारी केली आहे. यानंतर आमदार रोहित पवारांनी ट्विट करत धन्यवाद म्हटले आहे. तसेच आता आयोगातील कोणत्या व्यक्तीचा राजीनामा हवा आहे, त्याचे नावही सांगितले आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. यात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी डी नाईक यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. तर तुकाराम मुंढे यांची सदस्य सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. निवृत्त आयएएस गणेश पाटील आणि आयपीएस लखमी गौतम सदस्य म्हणून समितीमध्ये समाविष्ट केले आहे. यावर रोहित पवारांनी ट्विट करत मोठं वक्तव्य केले आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले की, धन्यवाद…! अखेर MPSC च्या विविध परीक्षांच्या पेपरफुटीसह आणि शिपाई ते अध्यक्ष यांची चौकशी करुन आयोगाच्या संपूर्ण शुद्धीकरणासाठी Commissions Of Enquiry Act-1952 अंतर्गत न्यायिक आयोग स्थापन झाला आहे. आयोगाकडून औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसह Group B, Group C तसंच इतर संशयित परीक्षांचीही चौकशी होणार आहे. आयोगाला असलेले अधिकार बघता खालपासून वरपर्यंत संपूर्ण शुद्धीकरण होईल तसंच ३१७ च्या पुढील कारवाईसाठी शिफारस होईलच, ही अपेक्षा, असं ते म्हणाले आहेत. तसेच अजून एका व्यक्तीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले की, विद्यमान सदस्य अभय वाघ हे मोठे ‘खिलाडी’ असून त्यांना देखील भीमनवार यांच्याप्रमाणे रजेवर पाठवावे, अशी विद्यार्थ्यांची तीव्र भावना आहे. याबाबत सरकारने लक्ष घालावं, ही विनंती! Group B संदर्भात पुढच्या आठवड्यात न्यायिक आयोगाला भेटणार असून शक्य असतील तेवढे सर्व पुरावे आपल्याला द्यायचे आहेत, त्यामुळं विद्यार्थ्यांनी सर्व पुरावे विद्यार्थी प्रतिनिधी किंवा आमच्याकडे जमा करावेत, एकही दोषी सुटणार नाही याची आपण काळजी घेऊ. जब तक घर भेजेंगे नहीं… तब तक छोड़ेंगे नहीं…! असं रोहित पवारांनी सांगितलं आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा