AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ताधारी महायुतीचे आमदार MPSC आंदोलनस्थळी, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावर भूमिका काय? म्हणाले…

MPSC Students Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी संग्राम जगताप यांनी उपस्थिती लावली होती. त्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच अध्यक्षांबाबतही वक्तव्य केले आहे.

सत्ताधारी महायुतीचे आमदार MPSC आंदोलनस्थळी, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावर भूमिका काय? म्हणाले...
| Updated on: Oct 03, 2026 | 7:56 PM
Share

पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार संग्राम जगताप आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर आंदोलनस्थळी सहभागी झाले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे संग्राम जगताप यांनी सांगितले. या आंदोलनामागे कोणताही राजकीय अजेंडा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संग्राम जगताप म्हणाले की, हे सगळं झालं कुणामुळे? त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. तुमच्यानंतर एकाही विद्यार्थ्यावर अशी वेळ आली नाही पाहिजे. त्यासाठी योग्य बंदोबस्त झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग दिला जात असल्याच्या चर्चेवरही जगताप यांनी भाष्य केले आहे.

ते म्हणाले की, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी मागण्या मांडल्या तर त्याला राजकारण म्हटलं जातं. पण आम्ही विद्यार्थी आंदोलनाला दिशा देण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून त्यानुसार शासनाकडून आदेश निघाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. पण एमपीएससी अध्यक्षांबाबत सुरू असलेल्या आरोपांवरही जगताप यांनी सावध भूमिका घेतली.

अध्यक्षांचे काही व्यक्तींशी संबंध असल्याच्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की, संबंध प्रत्येकाचे प्रत्येकासोबत असतात. संबंधांसाठी कुणाची परवानगी लागत नाही. अध्यक्षांना उद्या आपणही भेटू शकतो. एखादा विद्यार्थी जाऊन भेटला तर त्यात गैर काय? असा सवाल त्यांनी केला. अध्यक्ष दोषी आहेत की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्यामुळे पुरावे आणि चौकशीशिवाय कोणताही अंतिम निर्णय घेता येणार नाही, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

त्याचवेळी विद्यार्थ्यांनी आंदोलन करणे हा लोकशाहीचा भाग असून त्यांच्या मागण्यांमधील तीव्रता सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आंदोलन गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील शास्त्री रोडवर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. सरकारकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...