AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटीची ‘NCMC स्मार्ट कार्ड’ नोंदणी सुरु, महिलांचा सर्वाधिक पुढाकार, एक लाख नोंदणीचा टप्पा पार

एसटीतील नव्या NCMC स्मार्टकार्डमुळे भविष्यात सवलतधारक प्रवाशांना तिकीट खरेदी करणे अधिक सुलभ होणार आहे. भविष्यात एकच कार्ड विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी उपयोगात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे असेही एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.

एसटीची ‘NCMC स्मार्ट कार्ड’ नोंदणी सुरु, महिलांचा सर्वाधिक पुढाकार, एक लाख नोंदणीचा टप्पा पार
msrtc and pratap sarnaik
| Updated on: Mar 01, 2026 | 11:39 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ( एसटी ) डिजिटल सेवांच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे. सवलतधारक प्रवाशांच्या सोयीसाठी आता एसटीने ‘NCMC स्मार्ट कार्ड’ सुरु केले आहे. यासाठीची नोंदणी देखील सुरु झाली आहे. या नोंदणी आता एक लाखाच्या महत्वाचा टप्पा ओलांडला आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.सध्या सवलतधारक प्रवाशांना या कार्डाशिवाय देखील प्रवासाची मूभा देण्यात आली आहे. परंतू या कार्डाची नोंदणी सर्वच ठिकाणी सुरु असून त्यांनी नोंदणी करावी असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

एसटीने डिजिटल इंडियाच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे ‘NCMC स्मार्ट कार्ड’ उपक्रम होय. सवलत धारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या कार्डच्या नोंदणीची संख्या आता 1 लाखाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचली आहे.ही संख्या केवळ एक आकडा नसून, एसटीच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने झेपावणारे मोठे पाऊल असल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

केवळ आठवड्याभरात या उपक्रमांतर्गत एकूण 1,00,021 प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यात ‘महिला सन्मान योजना’ लाभार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग असून तब्बल 37,927 महिलांनी या आधुनिक सुविधेचा स्वीकार केला आहे. त्याचप्रमाणे ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत 34,948 ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करून डिजिटल प्रवासाच्या नव्या पर्वाचे स्वागत केले आहे. तसेच इतर ज्येष्ठ नागरिक 24,927 आणि इतर प्रवासी 2,219 अशा विविध घटकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

एसटी महामंडळाचा हा उपक्रम केवळ तांत्रिक बदल नाही. तर सवलतधारक प्रवाशांच्या प्रवासाला अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक बनविण्याचा दूरदर्शी प्रयत्न आहे. रोख व्यवहारांच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत, डिजिटल माध्यमांचा स्वीकार करण्यासाठी प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याचे या नोंदणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.

NCMC स्मार्ट कार्डची सक्ती नाही

1 मार्चपासून NCMC स्मार्ट कार्ड असल्याशिवाय सवलत धारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा समाज माध्यमांवर पसरली होती. मात्र, जोपर्यंत 80% सवलत धारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळच्या बसस्थानक, आगार अथवा अधिकृत खासगी एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी , असे आवाहन महामंडळातर्फे केले आहे.

भविष्यात एकच कार्ड सर्व वाहनांसाठी

भविष्यात NCMC स्मार्ट कार्डमुळे सवलत धारक प्रवाशांना तिकीट खरेदी करणे अधिक सुलभ होणार असून, भविष्यात एकच कार्ड विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी उपयोगात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एसटी महामंडळाने हाती घेतलेला हा अभिनव उपक्रम डिजिटल महाराष्ट्राच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल ठरत असून, प्रवाशांच्या विश्वासाच्या बळावर हा प्रवास अधिक वेगाने पुढे जात आहे असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...