AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शालेय विद्यार्थ्यांच्या तक्रारींना कंटाळले एसटीचे वाहक-चालक, सुरु केले नियमानुसार काम आंदोलन,प्रवाशांचे झाले वांदे

'गाव तेथे एसटी' असे एकेकाळी एसटीचे 'ब्रीदवाक्य' होते. परंतू आता अनेक मार्ग बंद झाल्याने एसटी महामंडळाची पार रया गेली आहे. 'प्रवासी नाही म्हणून उत्पन्न नाही, उत्पन्न नाही म्हणून नव्या एसटी नाहीत' अशा विचित्र कोंडीत महामंडळ सापडले आहे. बुलढाण्यातील शेगावातील एसटी वाहक आणि चालकांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारींना कंटाळून अखेर निमयानुसार काम आंदोलन सुरु केले आहे. याचा फटका मात्र प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे.

| Updated on: Jan 22, 2026 | 4:25 PM
Share
55 प्रवाशांची क्षमता असलेल्या एसटी बसेसमध्ये एरव्ही 90 ते 100 प्रवाशांची वाहतूक करीत असताना सुद्धा नागरिकांकडून तक्रारींचा पाढा सुरु आहे. जादा गर्दीने कंडक्टर आणि चालकाच्या सौजन्याला ही आता मर्यादा येत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना बसमध्ये चढता न आल्यास त्यांचे पालक तक्रारी करीत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे.

1 / 7
 त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून शेगावातील एसटी चालक आणि वाहकांनी नियमानुसार काम आंदोलन सुरु केले आहे. आता नियमानुसार एसटीच्या क्षमतेनुसारच प्रवासी बसमध्ये बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

2 / 7
 आधीच शेगाव एसटी आगारामध्ये एसटी बसेसची कमतरता असून या बस स्थानकावर राज्यभरातील प्रवासी श्रींच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे अधिक गर्दी होत असते. येथील एसटी आगाराचे उत्पन्नही बऱ्यापैकी आहे.

3 / 7
दरम्यान शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये विद्यार्थ्यांकरीता एसटी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत, मात्र शेवटच्या स्टॉपपर्यंतचे विद्यार्थी आणि प्रवासी बसमध्ये चढत असताना अनेक प्रवासी आणि विद्यार्थी खालीच राहतात.त्यामुळे असे विद्यार्थी आणि प्रवासी नेहमीच या एसटी चालक वाहकांच्या तक्रारी वरिष्ठांकडे करताहेत.

4 / 7
 वरिष्ठ अधिकारी कुठलीही सहनिशा न करता चालक वाहकांना जाब विचारतात. यामुळे त्रस्त होऊन चालक आणि  वाहकांनी शेगावच्या बस स्थानकात अनोखे आंदोलन करून निषेध केला आहे.

5 / 7
साधारण एका एसटी बसेसची क्षमता  55 अधिक एक एवढीच असल्याने यापेक्षा एकही प्रवासी आता एसटी बसमध्ये नेणार नसल्याची भूमिका कंडक्टर आणि चालकांनी घेतली आहे.त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

6 / 7
शासनाने आम्हाला आता 55 प्रवाशांपेक्षा एकही जादा प्रवासी बसमध्ये न घेण्याची परवानगी घ्यावी. तसेच नवीन बसेसची संख्या तरी वाढवावी अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.  शेगाव ते जळगाव तसेच शेगाव ते पातुर्डा या बसमधून जादाचे प्रवासी खाली उतरवून देण्यात येत आहेत.त्यामुळे शेगाव आगारात एसटी बसेसची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.

7 / 7
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.