AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Hotel Food Prices : मुंबईकरांना महागाईचा झटका, हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या दरात होणार इतक्या टक्क्यांनी वाढ

Mumbai Hotel Food Prices :मुंबईकरांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यांपासून मुंबईतील खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Mumbai Hotel Food Prices : मुंबईकरांना महागाईचा झटका, हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या दरात होणार इतक्या टक्क्यांनी वाढ
hotel foodImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 17, 2026 | 9:41 AM
Share

पश्चिम आशियातील तणावजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचं संकट आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पेट्रोल, खाद्यतेलासहित भाजीपाल्याच्या दरात होऊ लागली आहे. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूचे भाव कडाडले आहेत. यामुळे मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे दर येत्या 1 ते 2 आठवड्यात 10 ते 15 टक्क्यांनी वाढण्याची मोठी शक्यता आहे. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन’ने संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आलाय.

मागील काही महिन्यांपासून किरकोळ बाजारात भाजीपाला, धान्य, कडधान्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.  रोजचा भाजीपाला, विविध डाळी, खाद्यतेलाच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे. दुष्काळामुळे शहरात पोहोचणाऱ्या शेतमालाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपालाच्या किंमती कडाडल्या आहेत. व्यावसायिक गॅस,  व्यावसायिक जागांचे भाडे वाढले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे हॉटेल व्यावसायिकांना कामकाज आणि व्यवस्थापनाचा खर्च चालवणे अशक्य झाले आहे.

खाद्यपदार्थाच्या दरात होणार वाढ

वाढत्या महागाईमुळे खाद्यपदार्थांच्या दरवाढीशिवाय पर्याय उरला नसल्याचे आहार संघटनेचे म्हणणे आहे. चहा-नाश्त्याच्या पदार्थात आधीच वाढ झाली आहे. आता हॉटेलमधील जवळपास सर्वच खाद्यपदार्थांच्या किंमतीत 10 ते 20 रुपयांची वाढ होण्याची मोठी शक्यता आहे. ही वाढ लागू झाल्यास सर्वसामान्य मुंबकरांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. खरंतर याचा थेट परिणाम हा नोकरदार, शिक्षणासाठी घरापासून दूर राहणारे विद्यार्थी, ऑनलाइन जेवणे मागवणारे नागरिकांच्या मासिक बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पुढील आठवड्यात लागू होणार दरवाढ 

मुंबई आणि परिसरात ‘आहार’ या संघटनेचे 25000 हून अधिक सदस्य आहेत. यात रेस्टॉरंट आणि बारचाही समावेश आहे. या संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये नवीन दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे. या दरवाढीमुळे मुंबईकरांच्या हॉटेलमधील खाण्यापिण्यासाठी खिशाला अधिक कात्री लावावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात खाद्यपदार्थाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्या मुंबईकरांना खाद्यपदार्थांसाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील.

Follow Us
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम