AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपकेला सर्वात मोठा धक्का, …तर आता थेट गुन्हाच दाखल होणार; पोलिसांनी कंबर कसली!

मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सीजेपीच्या शाळांना भेटी देण्याच्या मोहिमेवर भाष्य केलं आहे. सीजेपीचे कार्यकर्ते विनापरवानगी शाळेत जात असतील तर आम्ही गुन्हे दाखल करू असा थेट इशाराच त्यांनी दिलाय.

अभिजीत दिपकेला सर्वात मोठा धक्का, ...तर आता थेट गुन्हाच दाखल होणार; पोलिसांनी कंबर कसली!
abhijeet dipke and cjpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 04, 2026 | 5:30 PM
Share

CJP School Campaign : कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीची देशभरात चर्चा आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता सीजेपीने देशातील शिक्षणव्यवस्थेत सुधारण घडवून आणण्यासाठी मोहीम चालू केली आहे. सीजेपीचे सदस्य आता देशभरातील शासकीय शाळांना भेटी देत आहेत. शाळांमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. सोबतच शाळांची स्थितीची पाहणी करून ते संबंधित प्रशासनाला तत्काळ त्रुटी दूर करण्यासाठी भाग पाडत आहेत. सीजेपीच्या या मोहिमेची महाराष्ट्रासह देशभरात चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता सीजेपीला मोठा धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांनी सीजेपीला थेट इशारा दिला असून गुन्हा दाखल करू असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

मुंबई पोलिसांनी नेमका काय इशारा दिला?

मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सीजेपीच्या शाळांना भेटी देण्याच्या मोहिमेवर भाष्य केलं आहे. सीजेपीचे कार्यकर्ते विनापरवानगी शाळेत जात असतील तर आम्ही गुन्हे दाखल करू असा थेट इशाराच त्यांनी दिलाय. सोबतच शाळा, स्कूल, कॉलेज हे विद्यार्थी आणि शिक्षकांचे आहे. त्यांच्या व्यवस्थापनाकडून परवानगी मिळत नसेल तर अशा ठिकाणी सीजेपीच्या नावाखाली आंदोलन केले जाऊ नयेत. अशा स्थितीत शाळेने तक्रार दिली तर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत, असं देवेन भारती यांनी स्पष्ट केलं.

सीजेपीच्या मोहिमेत नेमकं काय काय समोर आलं?

दरम्यान, सीजेपीने देशभरातील शाळांना भेटी देण्याचे ठरवलेले आहे. या मोहिमेची सुरुवात सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपके याने त्याच्या मूळ गावातून केली. त्याने इतरही काही शाळांना भेटी दिल्या आहेत. या भेटींमध्ये काही शाळांच्या स्वच्छतागृहाची स्थिती वाईट असल्याचे तर काही ठिकाणी वर्गखोल्या खराब असल्याचे समोर आलेले आहे. सीजेपीच्या या मोहिमेमुळे सरकारनेही शासकीय शाळांमध्ये दुरुस्ती करण्याचा विषय प्राधान्यक्रमावर घेतलेला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच इतरही राज्यांत शासकीय शाळांची स्थिती सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. असे असताना सीजेपीने विना परवानगी शाळेत जाण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल करू असा इशारा मिळाल्यानंतर सीजेपी यावर काय भूमिका घेणार? याकडे समस्त देशाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत