LIVE : मेंदूत रक्तस्राव झाल्याने प्रसिद्ध साहित्यिक किरण नगरकर यांचे निधन

LIVE : मेंदूत रक्तस्राव झाल्याने प्रसिद्ध साहित्यिक किरण नगरकर यांचे निधन
Picture

मेंदूत रक्तस्राव झाल्याने प्रसिद्ध साहित्यिक किरण नगरकर यांचे निधन

मुंबई : मेंदूत रक्तस्राव झाल्याने प्रसिद्ध साहित्यिक किरण नगरकर यांचे निधन, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास

05/09/2019,11:15PM
Picture

चिदंबरम पितापुत्रांना अटकपूर्व जामीन

एअरसेल मॅक्सिस प्रकरणात विशेष सीबीआय कोर्टाकडून पी चिदंबरम आणि कार्ति चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन मंजूर

05/09/2019,2:44PM
Picture

काँग्रेसची 2 ऑक्टोबरपासून पदयात्रा

काँग्रेस 2 ऑक्टोबरपासून पदयात्रा काढणार, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 2 ते 9 ऑक्टोबर दरम्यान यात्रास महात्मा गांधी यांच्या 125 व्या जयंतीचं निमित्त

05/09/2019,2:40PM
Picture

दादर स्टेशनवर संतप्त प्रवाशांचा रेल रोको

मुंबई : दादर रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको, पावसामुळे ट्रेन उशिरा धावत असल्याचा निषेध, तुतारी एक्स्प्रेस 20 मिनिटं रोखली

05/09/2019,2:35PM
Picture

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचं चिंतन

पुणे : राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची उद्या पुण्यात बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि पक्षाला लागलेल्या गळतीवर होणार चर्चा, शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळेही राहणार उपस्थित

05/09/2019,1:06PM
Picture

नितीन सरदेसाईंची ईडी कार्यालयात चौकशी

मुंबई : मनसेचे माजी आमदार आणि राज ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार नितीन सरदेसाई ईडी कार्यालयात, कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणात चौकशी होणार

05/09/2019,11:41AM
Picture

पी चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन नाकारला

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने नाकारला

05/09/2019,10:55AM
Picture

नागपूरकरांसाठी खूशखबर, तोतलाडोह धरणाचा पाणीसाठा वाढला

नागपूरकरांसाठी खुशखबर, नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणाचा पाणीसाठा वाढला, 43.13 टक्केपर्यंत पाणी साठा झाल्याने पाणी कपातीच संकट होणार दूर, मध्य प्रदेशाच्या चौराई दरवाजे उघडल्याने पाणीसाठा वाढला

05/09/2019,9:04AM
Picture

कोकणातील प्रमुख नद्यांची पातळी धोका पातळीपेक्षा कमी

कोकण : सावित्री व पाताळगंगा नदीची पातळी इशारा पातळीपेक्षा कमी, तर आबां व कुडंलिका नद्यांनी इशारा ओलांडली, चारही प्रमुख नद्या धोका पातळीपेक्षा कमी प्रमाणात वाहत आहे.

05/09/2019,9:03AM
Picture

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे NDRF चे पथक तैनात

मुंबईतील सर्व सखल भागातील पाणी ओसरले, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे NDRF टीमला अलर्ट राहण्याचे आवाहन, कुर्ला, अंधेरी, परळमध्ये NDRF चे पथक तैनात

05/09/2019,8:18AM
Picture

मुंबई लोकल अपडेट

?मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत, कसारा – आसनगाव वरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या 5 ते 10 मिनिट उशिराने, तर काही गाड्या रद्द ?पश्चिम रेल्वे – चर्चगेट ते विरार स्लो ट्रॅकवरील वाहतूक पूर्ववत ?हार्बर रेल्वे – सीएसएमटी-पनवेल आणि सीएसएमटी-अंधेरी दरम्यान वाहतूक सुरु

05/09/2019,8:12AM
Picture

कोकणात जाणारी सर्व वाहतूक पूर्ववत

रायगड : रोहा ते नागोठणेदरम्यान खारपाटी येथे पडलेली दरड हटवून कोकण रेल्वे सुरु, ताम्हाणी घाटात काल दरड कोसळल्याने रस्ते वाहतूक बंद केली होती, मात्र ती दरडही हटवून वाहतूक पूर्ववत, तर अलिबाग ते नागोठणे – रोहा दरम्यान भिसे खिडींतील दरड हटवून वाहतुक सुरळीत, अलिबाग – रोहा मार्गावरील रामराज येथील दरड हटवून वाहतूक सुरळीत

05/09/2019,8:10AM
Picture

मुंबई, ठाणे, कोकणातील शाळांना सुट्टी

05/09/2019,8:06AM
Picture

मुंबई, ठाणे, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मुंबईसह उपनगरात पावसाची विश्रांती, हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा, मुंबई, ठाणे, कोकण, रायगडमध्ये रेड अलर्ट, मुंबई, ठाणे, कोकणातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी, शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचे ट्विट

05/09/2019,8:06AM
Picture

तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत

? मध्य रेल्वे – मुसळधार पावसामुळे ठप्प झालेली मध्य रेल्वे पूर्ववत, सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची वाहतूक सुरु, पहाटे 3.17 मिनिटाने अंबरनाथच्या दिशेने पहिली लोकल रवाना ? हार्बर रेल्वे – सीएसएमटी ते अंधेरी लोकल वाहतूक सुरु, सकाळी 5.22 मिनिटांनी अंधेरीच्या दिशेने ट्रेन रवाना, तर सीएसएमटीहून सकाळी 6 वाजता लोकल रवाना ? पश्चिम रेल्वे – चर्चगेट ते विरारदरम्यानची जलद आणि धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्ववत

05/09/2019,8:03AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *