राहुल गांधींसोबत चालण्यासाठी कलाकारांना पैसै मिळतात; भाजपचा काँग्रेसवर निशाणा…

| Updated on: Nov 22, 2022 | 7:49 PM

सध्या महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा आल्यानंतर सिनेसृष्टीतील कलाकार सहभागी झाले आहेत, त्यावर आता भाजपने काँग्रेसने निशाणा साधला आहे.

राहुल गांधींसोबत चालण्यासाठी कलाकारांना पैसै मिळतात; भाजपचा काँग्रेसवर निशाणा...
Follow us on

मुंबईः काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहचल्यानंतर अनेक चर्चेना उधाण आले होते. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत अनेक अभिनेते व अभिनेत्री दिसून आल्या. भारत जोडो यात्रेतील कलाकारांच्या सहभागाबद्दल आता भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भारत जोडो यात्रा ही पैसे देऊन लोकांना जमा करण्याचा प्रयत्न केला असल्याचे भाजपने म्हटले आहे. भाजपने काँग्रेसवर हा आरोप लावल्यानंतर मात्र पलटवार करण्यात आला आहे.

भाजप नेता अमित मालवीय यांनी ट्विट करत त्यांनी असा दावा केला आहे की, राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभाग घेणाऱ्या कलाकारांना पैसे देण्यात येत आहेत.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये व्हाटस्अपच्या एका मेसेजचा त्यांनी स्क्रीनशॉटही शेअरही केला आहे. महाराष्ट्रात ही यात्रा आल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी सहभाग नोंदवल्यानंतर हा वाद उफाळून आला आहे.

अमित मालवीय यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, भारत जोडो यात्रेच्यानिमित्ताने फक्त राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारण्याचे काम काँग्रेसने केले आहे, त्यापेक्षा वेगळे काही यातून मिळाले नाही.

काँग्रेसने पैसे देऊन आपला जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात् पैसे घेऊन या यात्रेत सहभागी होणारी माणसं कोण आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

भाजपच्या अमित मालवीय यांनी ट्विट केल्यानंतर कांग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी त्यांना उत्तर दिले आहे. सिलेब्रिटींचे नकली समर्थन करण्याची कलेत भाजप नाही काँग्रेस माहीर आहे.

नंबर नसलेला व्हाटस्अप मेसेज शेअर करण्यात आला होता. जो व्हाटसअप मेसेज शेअर केला गेला होता, त्यामध्ये लिहिण्यात आले होते की, मध्य प्रदेशमध्ये राहुल गांधी यांच्याबरोबर 15 मिनिटं बरोबर चालण्यासाठी वेळ काढावा लागणार आहे.

कलाकार आपल्या प्रवासातील नियोजनानुसार वेळ काढू शकतात, आणि यासाठी कलाकार नोव्हेंबरमध्येच ते वेळ काढू शकतात असंही त्यांनी त्यामध्ये म्हटले होते.

त्यानंतर सचिन सावंत यांनी पलटवार करत भाजपला खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी सिलिब्रेटिंची ट्विट आम्हाला लक्षात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे भाजपची नियत सगळ्यांना माहिती आहे. समाजात दुही माजवण्याचा भाजपचे राजकारण सगळ्यांना माहिती असल्याचा टोलाही त्यांनी अमित मालवीयांना लगावला आहे.

जी लोकं भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहेत. ती माणसं देशहितासाठी हातातहात घालून चालू लागली आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारत जोडो यात्रेवर ज्या प्रकारे टीका टिप्पणी केली आहे, त्यामुळे काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा योग्य मार्गावर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.