युवराजांनी आता म्हातारीच्या बुटाचा हट्ट करु नये, आरे, नाईट लाईफवरुन शेलारांचं टीकास्त्र

आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील 'मुंबई 24 तास' या योजनेवरुन आशिष शेलार यांनी टीका केली आहे (Ashish Shelar slam Aaditya Thackeray).

युवराजांनी आता म्हातारीच्या बुटाचा हट्ट करु नये, आरे, नाईट लाईफवरुन शेलारांचं टीकास्त्र
Follow us
| Updated on: Jan 30, 2020 | 1:44 PM

मुंबई :  “मुंबईकरांनी बालहट्टच पुरवायचे का?”, असा खोचक सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला आहे (Ashish Shelar slam Aaditya Thackeray). आरे कारशेडबाबत मेट्रो कारशेड समितीने दिलेला अहवाल महाराष्ट्रासाठी बंधनकारक नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला (Ashish Shelar slam Aaditya Thackeray).

आशिष शेलार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आदित्य ठाकरेंवर टीका केली. “पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे. मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का? एक दिवस युवराजांनी मला “म्हातारीचा बूट” हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं”, असा टोला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

मुंबईतील मेट्रो-3 प्रकल्पासाठी आरे कॉलनीत जागाच योग्य असल्याचा अहवाल चार सदस्यीय मेट्रो कारशेड समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. मात्र, त्या समितीचा अहवाल महाराष्ट्र सरकारसाठी बंधनकारक नसल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यामुळे आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुंबई मेट्रो-3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील काही जागा फडणवीस सरकारकडून निश्चित करण्यात आली होती. मात्र, पर्यावरणप्रेमी आणि अनेक मुंबईकरांकडून आरे कारशेडला विरोध करण्यात आला. कारण कारशेडसाठी आरेतील शेकडो झाडे तोडावी लागणार होती. जनतेचा विरोध पाहता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.