मुंबईजवळ महिला पोलीस पाटलावर चार पुरुषांचा जीवेघणा हल्ला

| Updated on: Jun 03, 2019 | 7:14 AM

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापुरात महिला पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला झाल आहे. चार पुरुषांनी हा हल्ला केला. जमिनीच्या वादातून हल्ला झाला. अंजना भाऊ घोडविंदे असे महिला पोलीस पाटलाचे नाव आहे. शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरांगण गावात हा हल्ल्याचा प्रकार घडला. या हल्ल्यात अंजना भाऊ घोडविंदे यांच्या तोंडाच्या ओठाला, हाताला आणि पायाला जबर मार […]

मुंबईजवळ महिला पोलीस पाटलावर चार पुरुषांचा जीवेघणा हल्ला
Follow us on

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापुरात महिला पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला झाल आहे. चार पुरुषांनी हा हल्ला केला. जमिनीच्या वादातून हल्ला झाला. अंजना भाऊ घोडविंदे असे महिला पोलीस पाटलाचे नाव आहे.

शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरांगण गावात हा हल्ल्याचा प्रकार घडला.

या हल्ल्यात अंजना भाऊ घोडविंदे यांच्या तोंडाच्या ओठाला, हाताला आणि पायाला जबर मार लागल्याने त्या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दत्तात्रय मालू लकडे, तानाजी मालू लकडे, ज्ञानेश्वर दत्तात्रय लकडे आणि महेश दत्तात्रय लकडे हे या हल्ल्यातील हल्लेखोर आहेत. हे सर्व सर्व हल्लेखोर एकाच कुटुंबातील असून खरांगण गावातीलच रहिवाशी आहेत.

दरम्यान, हल्ला करणारे चारही जण अद्याप मोकाट असल्याने शहापुरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.