राणीच्या बागेत सिंह आणि वाघ यांची युती पाहायला मिळणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : शिवसेना भाजप यांच्यात युती झाली तेव्हा वाघ आणि सिंह एकत्र आले, अशी जोरदार चर्चा झाली. पण आता हे खरच सत्यात उतरणार आहे. ‘वीर जिजामाता उद्यान’ म्हणजेच राणीच्या बागेचा विस्तार होणार आहे. लवकरच राणी बागेत वाघ आणि सिंहाची युतीही पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राचा वाघ आणि गुजरातच्या सिंहाची राणीच्या बागेत दोस्ती पाहायला मिळणार आहे. गुजरातहून येणाऱ्या या सिंहाचं […]

राणीच्या बागेत सिंह आणि वाघ यांची युती पाहायला मिळणार
Follow us on

मुंबई : शिवसेना भाजप यांच्यात युती झाली तेव्हा वाघ आणि सिंह एकत्र आले, अशी जोरदार चर्चा झाली. पण आता हे खरच सत्यात उतरणार आहे. ‘वीर जिजामाता उद्यान’ म्हणजेच राणीच्या बागेचा विस्तार होणार आहे. लवकरच राणी बागेत वाघ आणि सिंहाची युतीही पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राचा वाघ आणि गुजरातच्या सिंहाची राणीच्या बागेत दोस्ती पाहायला मिळणार आहे. गुजरातहून येणाऱ्या या सिंहाचं रक्षण महाराष्ट्राचा वाघ करणार असल्याचं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं.

राणी बागेचं नुतनीकरण सुरु आहे. याचा तिसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. यासाठी गुजरातहून पांढरा सिंह आणला जाणारा आहे. तर औरंगाबादच्या प्राणिसंग्रालयातून एक वाघ राणीबागेत आणला जाणार आहे. त्यामुळे गुजरातच्या सिंहाची आणि महाराष्ट्रातील वाघाची राणी बागेत युती पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, जंगलाचा राजा असणाऱ्या सिंहाचं रक्षण आता शिवसेनेचा वाघ करणार, अशी खोचक टीका मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली. त्यामुळे युती झाली असली तरीही भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका मात्र सुरु आहे.

राणी बागेचा लवकरच कायापालट होणार आहे. यासाठीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आणि दुसरा टप्पा अंतिम टप्प्यात असताना आता तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ होणार आहे. यासाठी एकूण 200 कोटींचा खर्च येणार असून या तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय प्राणी संग्रालयाची मंजुरी मिळाली आहे. यात एकूण 12 एकर जमिनीवर हा विस्तार होणार असून यात देशी-विदेशी प्रजातींच्या प्राण्यांकरिता विविध सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.