Krushanraj Mahadik: मनसेच्या चोरांना… भाजयुमोचे कृष्णराज महाडिक यांचा पारा चढला, मोदी यांच्या फोटोवरील वादवर सणसणीत प्रतिक्रिया

Krushanraj Mahadik On MNS: पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील पंतप्रधान मोदी यांचा फोटो हटवल्यानंतर मनसे आणि भाजपच्या कार्यकर्ते आमने-सामने आले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणावरून भाजयुमोचे कान टोचले होते. आता प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मनसेवर पटलवार केला आहे.

Krushanraj Mahadik: मनसेच्या चोरांना... भाजयुमोचे कृष्णराज महाडिक यांचा पारा चढला, मोदी यांच्या फोटोवरील वादवर सणसणीत प्रतिक्रिया
कृष्णराज महाडिक
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 02, 2026 | 12:57 PM

माहिममधील आंदोलनाविषयी बोलताना मनसेचे काही चोर तिथं आले होते. भाजयुमोचे कार्यकर्ते आंदोलन करत असताना त्यांच्या काही लोकांनी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप भायजुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केला. आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मनसेला जशाच तसे उत्तर दिले आहे. मनसेचे चोर आले होते. त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. यापुढे जर तुम्ही असा काही प्रयत्न केला तर जशाच तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा महाडिक यांनी दिला.

मनसेवर बोचरी टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदाचा, त्यांचा जो अपमान झाला, त्याविरोधात आम्ही आवाज उठवला. अमित ठाकरे यांनी संविधानाचा अपमान केला आहे. पुण्याच्या महाविद्यालयात जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्हाला बेसिक प्रोटोकॉल माहिती नाही. पंतप्रधान असतील अथवा राष्ट्रपती असतील, त्यांचा फोटो लावला जातो. पण मनसेने एक चुकीचा संदेश तरुणांपर्यंत पोहचवला. मनसेने असे प्रकार थांबवले पाहिजे, असे आवाहन महाडिक यांनी केले.

भाजयुमोची तात्कालीक प्रतिक्रिया 

आमचे नेते रवींद्र चव्हाण यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करतो. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे देशासाठी, समाजासाठी समर्पित केलं आहे. जेव्हा त्यांचा अपमान होतो, तेव्हा सहाजिक आहे की, तरुणांच्या मनात राग येणे स्वाभाविक आहे. तोच राग व्यक्त करण्यासाठी आमचे कार्यकर्ते एकत्र रस्त्यावर उतरले होते. रवींद्र चव्हाण यांनी जो आदेश दिला, त्याचे आम्ही पालन करतो, पुढेही करणार. भाजपयुमो ही वेगळी विंग आहे. आजच्या तरुणाईला दाबून ठेवता येणार नाही. त्यामुळे आम्ही काल आंदोलनाचा मार्ग निवडला. कालची गोष्ट झाली ती झाली. चव्हाण यांचं भाषण आम्ही ऐकलं. पण जेव्हा ही भाजयुमोकडून आंदोलन होईल तेव्हा त्यातून गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते तयार होणार नाही असे महाडिक म्हणाले. इथुन पुढं युवा मोर्चा जे काही पाऊल टाकेल ते विवेकपूर्ण आणि विचारपूर्वक असेल, असा महाडिक म्हणाले. दरम्यान कालच्या आलेल्या पोराविरोधात आंदोलन करणे चूक असल्याचा कानमंत्री प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांना दिला होता. त्यांनी कालच्या आंदोलनावर एकप्रकारे नाराजी व्यक्त केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us