आदिवासी, शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी; सर्पदंशावर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, काय फायदा होणार?

Snakebite will be notified diseases: गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील एका आदिवासी आश्रम शाळेत मण्यार जातीच्या सापाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. त्यानंतर आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील आदिवासी, शेतमजूर आणि शेतकर्‍यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

आदिवासी, शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी; सर्पदंशावर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, काय फायदा होणार?
सर्पदंश, शेतकरी, शेतमजूर, आदिवासींसाठी महत्त्वाची बातमी
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 18, 2026 | 6:52 PM

महाराष्ट्रात सर्पदंशाच्या घटना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात समोर येतात. गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथी आदिवासी आश्रम शाळेत जमिनीवर झोपलेल्या विद्यार्थींनीना मण्यार जातीच्या सापाने दंश केला. त्यात तीन विद्यार्थिंनीचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर आता सरकारने राज्यातील आदिवासी, शेतमजूर आणि शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सर्पदंशाचा ‘अधिसूचित आजार’मध्ये समावेश करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने सर्पदंशाच्या प्रकरणात मृत्यूचा आकडा कमी करण्याचा मोठा प्रयत्न होणार आहे.

सर्पदंशाचा ‘अधिसूचित आजार’मध्ये समावेश

सर्पदंशाचा ‘अधिसूचित आजार’मध्ये समावेश करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी याविषयीची मागणी केली होती. ती आरोग्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. 30 जून रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्यांनी आश्वासन दिले होते.

शेतात काम करताना, शाळेत, रस्त्याने जाताना, सर्पदंशाने विषबाधा होऊन ग्रामीण भागात अनेक जण दगावतात. पण सर्पदंशाची गणना आजारात करण्यात येत नव्हती. यामुळे बाधितांच्या नोंदी, तातडीचे उपाय, प्रतिबंधात्मक लस याविषयी सरकारने ठोस पावलं टाकली नव्हती. त्यानंतर आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आता लवकर उपचार

सर्पदंश हा अधिसूचित आजार म्हणून जाहीर करण्याची मागणी मी केली होती. तो निर्णय फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला आहे. सर्पदंशामुळे अनेक मृत्यू झाले आहेत. सर्पदंशावर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे हा मोठा निर्णय आहे. सर्पदंशानंतर व्यक्ती बरा झाला तरी त्यावर अनेक परिणाम दिसतात. त्यामुळे त्याचे देखील सर्वेक्षण केले जाणार आहे. अधिसूचित झाल्यामुळे मदत उपलब्ध होईल. काही प्रजाती चावल्यामुळे अर्धांगवायू होतो. कधीकधी अवयव काढावे लागतात. अधिसूचित आजारामुळे त्याचा समावेश होईल. सर्पदंशामुळे आजार झाला असेल तर आता फायदा होईल, असे भाजप आमदार विक्रम पाचपुते म्हणाले.

सर्पदंश अधिकृत झाल्याचे लाभ

सर्पदंशाच्या प्रत्येक घटनेची अधिकृत नोंद होईल

जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय सर्पदंशाचे प्रमाण समजेल

एक अधिकृत डाटा सरकारकडे येत्या दोन वर्षात तयार होईल

गरजेनुसार ASV या प्रतिविषाचा साठा उपलब्ध करण्याचे नियोजन होईल

ग्रामीण आणि दुर्गम आरोग्य केंद्रांतील स्थिती सुधारेल, तिथे या लसी उपलब्धी करून देण्यात येईल

सर्पदंशाच्या अधिक घटना घडत असलेल्या भागात जाणीव जागृती आणि इतर उपाय योजनांवर भर देता येईल

आरोग्य कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना, नागरिकांना सर्पदंशावर तातडीच्या उपचारांचे प्रशिक्षण देता येईल

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us