Navnath Ban: बाळासाहेबांना आदरांजली वाहण्याचेही राहुल गांधी यांना नाही भान, उबाठा गट गप्प का? नवनाथ बन यांनी ओढला चाप
Navnath Ban criticized Rahul Gandhi And Uddhav Thackeray: सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांचा 14 वी स्मृतीदिन होता. उद्धव सेनेसह शिंदे सेनेतील सर्व दिग्गज नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अभिवादन केले. पण त्याचवेळी भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे गटाला एक रोकडा सवाल विचारला आहे.

Navnath Ban criticized Rahul Gandhi And Uddhav Thackeray: सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांचा 14 वी स्मृतीदिन होता. उद्धव सेनेसह शिंदे सेनेतील सर्व दिग्गज नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. त्याचवेळी भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे सेनेला एक रोकडा सवाल केला आहे. बाळासाहेबांना आदरांजली वाहण्याचेही राहुल गांधींना भान नाही उरले, त्यावर उबाठा गट गप्प का? असा थेट सवाल बन यांनी विचारला. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करून काँग्रेसची गुलामी कशासाठी? उद्धव ठाकरे, संजय राऊतांना त्यांनी सवाल विचारला. राहुल गांधींच्या अजेंड्यावर माना डोलावता, मग बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर मौन का? बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको. उबाठाच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश झाल्याचे ते म्हणाले. भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक्सवरून काय म्हटलंय पाहूयात.
उबाठा आता कोणती भूमिका घेणार?
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडिया खाते, एक्सवरून याप्रकरणी सवाल विचारला आहे. “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला राहुल गांधी यांनी साधी आदरांजलीही वाहिली नाही, ही बाब निश्चितच विचार करायला लावणारी आहे. मात्र, ज्यांच्या विचारांवर आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिवसेनेची ओळख उभी राहिली, त्याच वंदनीय बाळासाहेबांचा वारसा सांगणारी उबाठा आता नेमकी कोणती भूमिका घेणार आहे?” असा सवाल त्यांनी विचारला.
हा कसला स्वाभिमान?
राहुल गांधींच्या प्रत्येक अजेंड्यावर माना डोलावणारे उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवण आता का होत नाही? राहुल गांधींच्या राजकीय दरबारात निष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपडायचे आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा विषय आला की मौन बाळगायचं, हा कसला स्वाभिमान? असा जहरी टोला बन यांनी लगावला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला राहुल गांधी यांनी साधी आदरांजलीही वाहिली नाही, ही बाब निश्चितच विचार करायला लावणारी आहे. मात्र, ज्यांच्या विचारांवर आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिवसेनेची ओळख उभी राहिली, त्याच वंदनीय बाळासाहेबांचा वारसा सांगणारी उबाठा आता नेमकी कोणती भूमिका घेणार आहे?
राहुल गांधींच्या प्रत्येक अजेंड्यावर माना डोलावणारे उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवण आता का होत नाही? राहुल गांधींच्या राजकीय दरबारात निष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपडायचे आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा विषय आला की मौन बाळगायचं, हा कसला स्वाभिमान?
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सत्तेची स्वप्ने पाहताना बाळासाहेबांचे हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि स्वाभिमान मात्र विसरायचा हेच यांचं धोरण आहे. उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी स्पष्ट करावे की, त्यांच्यासाठी वंदनीय बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत की काँग्रेसची गुलामी? स्वार्थासाठी विचारांची तडजोड आणि निष्ठेची विक्री, हाच उबाठा गटाचा नवा राजकीय अजेंडा आहे का?
@OfficeofUT @ShivSenaUBT_ @AUThackeray @rautsanjay61
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) November 18, 2026
हाच उबाठा गटाचा नवा राजकीय अजेंडा आहे का?
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सत्तेची स्वप्ने पाहताना बाळासाहेबांचे हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि स्वाभिमान मात्र विसरायचा हेच यांचं धोरण आहे. उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी स्पष्ट करावे की, त्यांच्यासाठी वंदनीय बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत की काँग्रेसची गुलामी? स्वार्थासाठी विचारांची तडजोड आणि निष्ठेची विक्री, हाच उबाठा गटाचा नवा राजकीय अजेंडा आहे का?, असा सवालही भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी विचारला आहे.
