AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात, मुंबईच्या महापौरांविरोधात ठिय्या आंदोलनामुळे कारवाई

किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. (BJP leader Kirit Somaiya Corruption charges on Mumbai Mayor Kishori Pednekar) 

किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात, मुंबईच्या महापौरांविरोधात ठिय्या आंदोलनामुळे कारवाई
| Updated on: Sep 28, 2020 | 2:03 PM
Share

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. त्यांनी अंगात निषेधाचे बॅनर घालून किशोरी पेडणेकरांचा निषेध व्यक्त केला. मात्र त्यावेळी पोलिसांनी कारवाई करत सोमय्यांना ताब्यात घेतलं. (BJP leader Kirit Somaiya Corruption charges on Mumbai Mayor Kishori Pednekar)

“महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरएच्या (SRA) जागेचा गैरव्यवहार केला आहे. त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि त्यांची हकालपट्टी करावी. याबाबत आम्ही बीएमसी आणि एसआरएकडे कारवाईची मागणी केली आहे. पुरावेही सादर केले आहेत. जर 48 तासामध्ये पेडणेकर यांच्यावर कार्यवाही झाली नाही, तर मी महापालिका समोर धरणा आंदोलन करेन, असे सांगितले होते.

त्यानुसार किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश न दिल्याने त्यांनी मनपाच्या गेटसमोर हे आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान त्यांनी मुंबईच्या महापौरांची हकालपट्टी करा, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.

यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्या यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना पोलीस स्टेशनमध्येही नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तुम्ही मला अटक करु शकत नाही, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांना कायदा समजवत त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

गोमाता जनता SRA वरळी येथील गरिब झोपडपट्टीवासियांसाठी राखीव ठेवलेल्या अर्धा डजन सदनिका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ढापल्या आहेत. त्यांची हकालपट्टी व्हायला हवी. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, याबाबत राज्य सरकार, गृहमंत्री, SRA यांच्याकडे मी पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी आंदोलनादरम्यान बोलताना दिली होती.

नेमकं प्रकरणं काय? 

“मूळ लाभार्थ्यांना 2006/2008 मध्ये गोमाता जनता (SRA) सोसायटीत (गणपतराव कदम मार्ग, वरळी) सदनिका देण्यात आल्या. बिल्डिंग क्रमांक 2 मधील 601 हा गाळा अलॉट करण्यात आला होता. त्यात कुठेही मुंबईच्या महापौर किंवा त्यांच्या परिवारांचं नाव नव्हतं. हा गाळा महेश लक्ष्मण नरमुल्ला या लाभार्थ्यांच्या नावाने देण्यात आला आहे. परंतु, त्या गाळ्यावर गेली 8 ते 10 वर्षांपासून महापौर किशोरी पेडणेकरांचा कब्जा आहे. त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात पण आपल्या घराचा पत्ता हाच दिला आहे. येथे याच बिल्डिंग क्र. 1 मधील तळमजला, गाळा क्र. 4 ही लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. परंतु हा गाळा पण किशोरी पेडणकर परिवाराच्या ताब्यात किश कॉपोरेशनचे कार्यालय म्हणून आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

“महापौरांनी स्वतः स्थापन केलेले किश कॉपोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लि. कंपनीचे कार्यालय या ठिकाणी आहे. गेल्या आठवड्यात मी स्वत: आणि SRA अधिकाऱ्यांनीही येथे भेट दिली. तसेच पाहणी केली. या रहिवासी जागेचा व्यावसायिक कामासाठी करण्यात येत आहे. यापैकी बिल्डिंग क्र. 1, तळमजला, येथे रहिवाशी उपयोगाचे प्रमाणपत्र/Permission होती/आहे. त्यावर या सदनिका लाभार्थींना देण्यात आल्या, त्यात कुठेही मुंबईचे महापौर किशोरीताई पेडणेकर किंवा त्यांच्या परिवाराचे नाव नाही,” अशी माहिती सोमय्या यांनी दिली.

“मुंबईचे महापौर आणि त्यांचं कुटुंब झोपडवासीयांच्या जागेत बेकायदेशीररित्या व्यावसायिक वापर करत आहेत. त्यावर महापालिका व SRA ने अजूनपर्यंत कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्यांनी ताबडतोब कारवाई करावी. 2013 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली व कंपनी कार्यालयात रजिस्ट्रेशनसाठी अधिकृतरीत्या महापौर/परिवारांनी हा पत्ता व्यावसायिक कार्यालय म्हणून दिला आहे,” असं किरीट सोमय्या म्हणाले.(BJP leader Kirit Somaiya Corruption charges on Mumbai Mayor Kishori Pednekar)

संबंधित बातम्या : 

मुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या

तुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक