तुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा

"मुंबईत गेल्या 24 तासात एका तुळशी तलावाइतक्‍या पाण्‍याचा उपसा करण्‍यात आला", असा दावा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला (Aadity Thackeray on Mumbai rain).

तुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा

मुंबई : “मुंबईत गेल्या 24 तासात एका तुळशी तलावाइतके म्‍हणजे जवळपास साडेसहा ते पावणेसात हजार दशलक्ष लीटर इतक्‍या पाण्‍याचा उपसा करण्‍यात आला”, असा दावा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्याचबरोबर दादर आणि धारावी पर‍िसरात अवघ्‍या 12 तासात तब्‍बल 332 मिमी पाऊस कोसळला, अशी माहितीदेखील आदित्य ठाकरे यांनी दिली (Aadity Thackeray on Mumbai rain).

मुंबईत गेल्या 24 तासात झालेल्या अतिवृष्टिच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका क्षेत्रातील काही भागांची पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त इक्बाल चहल हेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. या पाहणीत आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला सखल भागातील पाण्‍याचा जलद निचरा करण्‍यासह विविध आवश्‍यक उपाययोजना करण्‍याचेही निर्देश दिले.

आदित्य ठाकरे यांनी या पाहणी दौऱ्यानंतर मुंबई महानगरपालिका मुख्‍यालयात आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन विभागाच्‍या नियंत्रण कक्षालाही भेट दिली. तिथे त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्‍यानंतर प्रसारमाध्‍यमांना प्रतिक्रिया दिली (Aadity Thackeray on Mumbai rain).

“मुंबईत गेल्या 24 तासात अतिवृष्‍टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही वैयक्तिक लक्ष आहे. दादर आणि धारावी पर‍िसरात अवघ्‍या 12 तासात तब्‍बल 332 मिमी पाऊस कोसळला. गेल्या 24 तासात मुंबईत एका तुळशी तलावाइतके म्‍हणजे सुमारे साडेसहा ते पावणेसात हजार दशलक्ष लीटर इतक्‍या पाण्‍याचा उपसा करण्‍यात आला”, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

“वेगवेगळ्या उदंचन केंद्र तसेच ठिकठि‍काणच्‍या उदंचन संचांद्वारे (पंप) पावसाळी पाण्‍याचा निचरा लवकर होऊ लागला आहे. मुंबईतील मोगरा आण‍ि माहूल या दोन पर्जन्‍यजल उदंचन केंद्रांचे काम पूर्ण झाल्‍यानंतर पाणी निचरा आणखी वेगाने होईल. असं असलं तरी त्‍यावर न थांबता नवीन पर्यायही शोधण्‍यात येत आहेत”, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

“मुंबईत पूर व्‍यवस्‍थापनासाठी ब्रिमस्‍टोवॅड प्रकल्‍पाची कामे करुन यंत्रणेची क्षमता वाढवली असली तरी पावसाळ्यात पाणी साचण्‍याची समस्‍या ही दरवर्षी उद्भवतेच. वारंवार अतिवृष्‍टी हा लहरी हवामानाचा तसेच वातावरण बदलाचा परिणाम आहे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

“चक्रीवादळ, पूर यासह इतरही हवामानाशी संबंध‍ित समस्‍यांचा सामना फक्‍त मुंबईलाच नव्‍हे तर जगातील अनेक शहरांना करावा लागत आहे. त्‍यामुळे ज्‍या-ज्‍या महानगरांना अशाप्रकारच्‍या समस्‍यांचा सामना करावा लागतो, त्‍यांनी केलेल्‍या पूरक उपाययोजनांची माहिती घेऊन त्‍यातून योग्‍य ते सक्षम पर्याय मुंबईसाठी निवडता येतील. यामध्‍ये वॉटर होल्‍ड‍िंग टँक (भूमिगत पाण्‍याच्‍या टाक्‍या) यासारखे पर्याय विचाराधीन आहेत”, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

“मुंबईच्‍या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल तसेच सर्व पदाध‍िकारी आणि प्रशासन मिळून एकदिलाने यावर काम करतील. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आण‍ि राज्‍य शासनाचे त्‍याला पूर्ण पाठबळ राहील”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही बघा : PHOTO | पैनगंगेच्या पुरामुळे सहस्रकुंड धबधब्याला अक्राळविक्राळ रुप, डोळ्याचे पारणे फेडणारे 9 फोटो

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *