AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ishan Kishan: तो प्लानचा भागही नव्हता, तरी..; इशान किशनबद्दल पाकिस्तानात काय चर्चा?

दोन महिन्यांपूर्वीपर्यंत ज्या खेळाडूची वर्ल्ड कप खेळण्याचीही कोणती अपेक्षा नव्हती, तोच आता पाकिस्तानविरोधातील भारताच्या विजयासाठी सर्वांत मोठा हिरो ठरला आहे. पाकिस्तानमध्येही इशान किशनची सध्या जोरदार चर्चा आहे.

Ishan Kishan: तो प्लानचा भागही नव्हता, तरी..; इशान किशनबद्दल पाकिस्तानात काय चर्चा?
इशान किशनImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 16, 2026 | 11:17 AM
Share

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवरील वर्चस्व कायम राखत भारतीय संघाने ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विक्रमी विजयाची नोंद केली. 40 चेंडूंमध्ये 77 धावा करणाऱ्या इशान किशनच्या उत्कृष्ट खेळीनंतर भारताने रविवारी पाकिस्तानचा 61 धावांनी सहज पराभव केला. इशान किशनने धाडसी फटके खेळत एकहाती भारताच्या डावाला वेग दिला होता. पाकिस्तानने फक्त दोन षटकं शाहीन शाह आफ्रिदी या वेगवान गोलंदाजाला दिली. त्यानंतर उर्वरित 18 षटकांसाठी त्यांनी सलमान आघा, उस्मान तारिक, सैम अयुब, मोहम्मद नवाझ, शादाब खान, अबरार अहमद अशा सहा फिरकी गोलंदाजांना वापरलं. इशान किशनने पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केल्यावर पाकिस्तानी गोलंदाजी गडबडून गेली. ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा हा पाकिस्तानवरील आठवा विजय ठरला. या विजयानंतर भारतात तर इशान किशनची चर्चा आहेच, परंतु पाकिस्तानमध्येही त्याच्या दमदार खेळीची जोरदार चर्चा होत आहे.

पाकिस्तानी पत्रकार शाहजार इक्बाल यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘दोन महिन्यांपूर्वीपर्यंत इशान किशन टी-20 वर्ल्ड कपच्या प्लॅनचा भागसुद्धा नव्हता. परंतु आता त्याने पाकिस्तानी गोलंदाजांच्या अटॅकची हालतच खराब केली आहे. हा कमालीचा कमबॅक आहे.’ भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाण यानेसुद्धा इशान किशनचं कौतुक केलं आहे. तर ‘एबीपी न्यूज’शी बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने म्हटलंय की इशानने कमालच केली आहे.

“आपल्याला हे स्वीकारावं लागेल की जिथे इतके फलंदाज संघर्ष करत होते, तिथे इशान किशनने कमालीचा परफॉर्मन्स दिला. आपण बाकी खेळाडूंबद्दल बोलत राहिलो, अभिषेक शर्माबद्दल बोलत राहिलो, पण इशान या मॅचचा हिरो ठरला”, असं तो म्हणाला. क्रीडा पत्रकार बोरिया मजूमदार यांनीसुद्धा म्हटलंय की, सर्व अडथळ्यांचा सामना केल्यानंतर इशान किशान एक उत्तम क्रिकेटर बनला आहे. मजूमदार यांनी एक्स अकाऊंटवर लिहिलं, ‘इशान किशनला स्वत:ला ओळखावं लागलं आणि पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. टिकून राहण्यासाठी त्याने स्वत:चा शोध घेतला. आता तो उत्तम खेळाडू बनला असून या जगाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे.’

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात