मुंबईत फायर रोबोटनंतर आता फायर बाईक, बीएमसी 3 कोटी खर्च करणार,अग्निशमन दलाचं बळ वाढणार?

| Updated on: Oct 27, 2021 | 6:20 PM

वाढत्या आगींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. महापालिकेच्या फायर ब्रिगेडच्या ताफ्यात आता फायर बाईक दाखल होणार आहे. मुंबईत फायर रोबोटनंतर आता फायर बाईक येणार आहे.

मुंबईत फायर रोबोटनंतर आता फायर बाईक, बीएमसी 3 कोटी खर्च करणार,अग्निशमन दलाचं बळ वाढणार?
फायर बाईक
Follow us on

मुंबई: वाढत्या आगींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. महापालिकेच्या फायर ब्रिगेडच्या ताफ्यात आता फायर बाईक दाखल होणार आहे. मुंबईत फायर रोबोटनंतर आता फायर बाईक येणार आहे. मुंबई महापालिकेच्या या प्रस्तावाला विरोध पक्षांकडून विरोध करण्यात येत आहे. फायर रोबोटचा प्रकल्प अयशस्वी ठरल्यानंतर फायर बाईक कशाला असा सवाल केला जातोय.

फायर बाईकचा फायदा काय?

मुंबईतील अरुंद गल्ल्या, दाटीवाटीच्या वस्तीत आग विझवण्यासाठी मुंबई महापालिका फायर बाईक्सची खरेदी करणार आहे. आग विझवण्यासाठी 3 कोटी 15 लाखांच्या फायर बाईक्सचा महापालिकेचा नवा प्रस्ताव आहे. महापालिकेच्या प्रस्तावाला विरोधी पक्ष विरोध करण्याची शक्यता आहे. फायर बाईकवरुन मुंबई महापालिकेला विरोधकांकडून काही सवाल विचारले जात आहेत.

7 कोटी पाण्यात गेल्यानंतर फायर बाईक कशाला

मुंबई महापालिकेनं यापूर्वी आग नियंत्रणात आणण्यासाठी फायर रोबोटसाठी 7 कोटींचा खर्च केला होता. मात्र, फायर रोबोट फेल गेल्यानं महापालिकेचे 7 कोटी पाण्यात गेलेत. त्यानंतर आता या फायर बाईक कशाला असा विरोधकांचा सवाल Eus.

एका फायर बाईकचा खर्च किती?

विशेष म्हणजे, एका फायर बाईकची किंमत 1 लाख 28 हजार आहे तर त्याच्यावरील फायर सिस्टीमसाठी, पाण्याच्या टाकीचा खर्च 10 लाख 22 हजार आहे. आधीच रोबोट फेल गेल्यानं आता गल्लोगल्ली जाऊन आग विझवणा-या फायर बाईक खरोखर उपयुक्त ठरणार का हा सवाल विरोधकांनी केलाय.

फायर बाईकचं प्रात्याक्षिक करुन दाखवा

मुंबईतील अग्निशनम विभागानं यापूर्वी राबवलेला फायर रोबोटचा प्रकल्प फसल्यानं विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी फायर बाईकच्या प्रस्तावाला विरोध केलाय. विरोधकांनी प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी आधी या फायर बाईकचे प्रात्याक्षिक करुन दाखवावे अशीही मागणी केलीय.

मुंबईत नुकतीच अविघ्न पार्क वन या इमारतीला आग लागली होती. त्यामुळं महापालिका अलर्ट झाली असून ज्यावेळी महापालिकेत फायर बाईकचा विषय चर्चेला येईल तेव्हा सत्ताधारी शिवसेना आणि विरोधकांमध्ये फायर बाईकच्या विषयावरुन वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इतर बातम्या:

आता JioPhone बद्दल सुंदर पिचाईंचा मोठा खुलासा, भारतातील सर्वात स्वस्त 4G फोन लवकरच लॉन्च होणार

T20 World Cup: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघावर संकट, दिग्गज खेळाडू बाहेर होण्याची दाट शक्यता

 

BMC will brought fire bike for fire brigade opposition parties may be opposed proposal