AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकल प्रवाशांच्या वैद्यकीय मदतीला ब्रेक, मध्य रेल्वेने EMR ला ठोठावला जबर दंड

लोकलच्या प्रवासात जखमी झालेल्या प्रवाशांना पहील्या एक तासाच्या आत ( गोल्डन अवर ) उपचार मिळावेत म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने उपनगरीय रेल्वे स्ठानकांवर इमर्जन्सी मेडीकल रूमची ( EMR) स्थापना करण्याचे आदेश दिले होते. परंतू रात्रीचे त्यांना टाळे लागते.

लोकल प्रवाशांच्या वैद्यकीय मदतीला ब्रेक, मध्य रेल्वेने EMR ला ठोठावला जबर दंड
mumbai local train
| Updated on: Jun 17, 2023 | 10:34 PM
Share

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर रोजचा धकाधकीचा प्रवास करताना सरासरी आठ ते दहा प्रवाशांचा हकनाक बळी जात असतो. या रेल्वे प्रवाशांना गोल्डन अवर मध्ये तातडीचे उपचार मिळून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या ( Mumbai High court ) आदेशाने  रेल्वे स्थानकांवर आपात्कालिन वैद्यकीय कक्षांची ( EMR) निर्मिती झाली होती. या वैद्यकीय कक्षांमध्ये एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध असावा आणि ते 24 तास उघडे असावेत असा नियम आहे. परंतू अनेक वैद्यकीय कक्ष रात्री आठ नंतर बंद होत असल्याचे उघडकीस आले होते. आता पश्चिम रेल्वेने ( Western Railway ) अशा ईएमआरवर कारवाई केल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही ( Central Railway )  कारवाईचा बडगा उगारला आहे.

पश्चिम रेल्वेच्या कांदिवलीसह अनेक स्थानकातील इएमआर रात्री आठ ते सकाळी नऊ चक्क बंद असल्याचे आरटीआय कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी उघडकीस आणले होते. मध्य रेल्वेच्याही अनेक स्थानकातील इएमआरनी ( EMR) देखील वेळ न पाळता रात्रीचे टाळे लावले असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जर एखादा अपघात झाला तर प्रवाशाला तातडीचे उपचार न मिळता त्याचे काही बरेवाईट होण्याचा धोका असल्याने यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी माहीतीच्या अधिकारात मध्य रेल्वेकडून माहीती मागितली होती.

समीर झव्हेरी यांनी आपात्कालिन वैद्यकीय कक्ष रात्रीचे बंद असल्याची तक्रार 12 फेब्रुवारी 2023 रोजी ट्वीटरवरुन रेल्वे मंत्रालयाला केली होती. त्याची प्रत जोडत मध्य रेल्वेकडून माहीती मागितली होती.  त्यानंतर मध्य रेल्वेने या ईएमआरची झाडाझडती केली. त्यावेळी  स्थानकाचे ईएमआर रात्री उघडी असतात का ? डॉक्टर आणि पॅरामेडीकल स्टाफची उपलब्धता आहे का ? अशी पाहणी करण्यात आली आणि बंद असलेल्या ईएमआरवर दंडात्मक कारवाई झाली.

अशी झाली दंडात्मक कारवाई 

अॅनी फाऊंडेशन संचालित भायखळा, घाटकोपर, सायन, विक्रोळी, डोंबिवली आणि वाशीची ईएमआर 8 ते 9 एप्रिलच्या रात्री आठ वाजता पाहणी दरम्यान बंद आढळली अनेक ईएमआर रात्री दहा नंतर बंद आढळली. ही ईएमआर दिवसाचे चोवीस तास उघडी हवीत त्यामुळे हे रेल्वेशी केलेल्या कराराचे उल्लंघन आहे. सहा ईएमआरना प्रत्येकी पाच हजार असा 30 हजाराचा दंड केला आहे. तर पनवेल, कळवा आणि भांडूपचे ईएमआर प्रकरणात त्यांचे संचलन करणाऱ्या मॅजिकडील हेल्थ कंपनीला 15 हजाराचा दंड सुनावला आहे. तर गोवंडीचे ईएमआर बंद असल्याचे आढळल्याने कंपनी जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टला पाच हजाराचा दंड सुनावला आहे.

मध्य रेल्वेच्या या स्थानकात वैद्यकीय कक्ष

सध्या भायखळा, दादर, कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, वाशी, पनवेल, सायन, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, ठाणे, कळवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, टिटवाळा आणि कर्जत या स्थानकांवर ईएमआर आहेत.

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...