AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे प्रवाशांनो सावधान, रात्री आठ ते सकाळी आठ जपून प्रवास करा, पश्चिम रेल्वेच्या ‘इएमआर’ ला रात्री आठ नंतर लागतात टाळे

लोकलच्या प्रवासात जखमी प्रवाशांवर उपचार करणारे आपत्कालीन वैद्यकीय कक्ष रात्री आठ नंतर बंद ठेवले जात आहेत, मग प्रवासी जखमी झाल्यास त्याच्यावर उपचार कोण करणार

रेल्वे प्रवाशांनो सावधान, रात्री आठ ते सकाळी आठ जपून प्रवास करा, पश्चिम रेल्वेच्या 'इएमआर' ला रात्री आठ नंतर लागतात टाळे
ONERUPEECLINICImage Credit source: socialmedia
| Updated on: Mar 19, 2023 | 10:59 PM
Share

मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलच्या रोजच्या प्रवासात अनेक प्रवाशांचा बळी जात असतो. काही प्रवासी जीव धोक्यात घालून रूळ ओलांडताना, तर काही प्रवासी चालती गाडी पकडताना पडून जखमी होत असतात अशा जखमी प्रवाशांना वेळेत ‘गोल्डन अवर’ मध्ये तातडीचे उपचार मिळावेत म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने ( HIGH COURT ) उपनगरीय लोकल स्ठानकांवर इमर्जन्सी मेडीकल रूमची ( EMR) स्थापना करण्याचे आदेश दिले होते. मात्र पश्चिम रेल्वेच्या कांदिवलीसह अनेक स्थानकातील इएमआर रात्री आठ ते सकाळी नऊ चक्क बंद असल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे.

उपनगरीय रेल्वे प्रवासात दररोज सरासरी आठ प्रवाशांचा बळी जात असतो. हे प्रमाण पूर्वी रोजचे सरासरी दहा प्रवासी असे होते. वर्षाला रेल्वे प्रवासात दोन हजार प्रवाशांचा बळी जात असतो. तेवढ्याच संख्येने प्रवासी जखमी होत असतात. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आपात्कालिन वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यात आले होते. प्रत्येक स्थानकांवर इएमआर स्थापन करून त्यात जखमी प्रवाशांवर प्रथमोपचार करण्याची सोय करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेतील एक प्रतिवादी माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी यासंदर्भातील कराराची प्रत टीव्ही नाईन मराठीला दिली आहे. त्यानूसार या ईएमआरमध्ये एक एमबीबीएस किंवा बीएएमएस वा बीएचएमएस डॉक्टर आणि दोन पॅरामेडीकल स्टाफ 24 तास तैनात असणे गरजेचे आहे. परंतू पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकातील इएमआर रात्री आठ वाजल्यानंतर बंद होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कांदिवली रेल्वे स्थानकात रात्री आठ वाजल्यानंतर ईएमआर बंद असल्याने कांदिवली रेल्वे स्थानक मास्तरांकडे अभिषेक पाठक यांनी तक्रार दाखल केली आहे.

पश्चिम रेल्वेवर एकूण 13 इमर्जन्सी मेडीकल रूम्स सकाळी आठ ते रात्री आठ अशा पद्धतीने केवळ दिवसाचे 12 तासच उघडी असतात. हे मुंबई उच्च न्यायालयाच्या 26 मार्च 2009 रोजीच्या आदेशाचे सरळ सरळ उल्लंघन असल्याचे आरटीआय कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी म्हटले आहे. इमर्जन्सी मेडीकल रूम्स रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी चोवीस तास उघडी ठेवणे बंधनकारक आहे.

आतबट्टयाचा व्यवहार

विरार रेल्वे स्थानकावरील इमर्जन्सी मेडीकल रूममुळे पश्चिम रेल्वेला वर्षाला केवळ बारा हजाराचा महसूल मिळतो. रेल्वे ईएमआरला वीज आणि पाणी मोफत देते. शिवाय त्यांना मेडीकल स्टोअर आणि प्रायव्हेट प्रॅक्टीसची परवानगी देते. केवळ जखमी रेल्वे प्रवाशांना त्यांनी मोफत उपचार करावेत अशी अपेक्षा त्यांच्याकडून असते. परंतू ही सेवाही ते जर चोवीस तास पुरवत नसतील तर प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याचे समीर झव्हेरी यांनी टीव्ही नाईन मराठीला सांगितले.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.