AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2023 : लातूर येथील कारखान्यात होणार आलीशान वंदेभारतच्या डब्यांची निर्मिती, रेल्वेमंत्र्यांनी ट्वीट केले

गेल्या अनेक वर्षांनंतर रेल्वेत इतक्या व्यापकस्तरावर गुंतवणूक झाली असून रेल्वेचे खरे पोटेन्शियल वापरले जाणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

Budget 2023 : लातूर येथील कारखान्यात होणार आलीशान वंदेभारतच्या डब्यांची निर्मिती, रेल्वेमंत्र्यांनी ट्वीट केले
ASHWINIVAISHNAVImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 01, 2023 | 7:33 PM
Share

मुंबई : अर्थसंकल्पात ( Budget ) रेल्वेसाठी अनेक वर्षांनंतर इतकी जादा गुंतवणूक झाली आहे. रेल्वेमध्ये ( railway) झालेल्या 2.40 लाख कोटी रूपयांच्या भांडवली गुंतवणूकीने रेल्वेची खरी क्षमता वापरली जाणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या रोजच्या अडीच कोटी तर वार्षिक 800 कोटी रेल्वे प्रवाशांच्या आकांक्षा पूर्ण होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुख्य अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नवी दिल्लीतून दूरसंवाद माध्यमाद्वारे जाहीर केले आहे. चेन्नईच्या आयसीएफ कोच फॅक्टरीसह हरीयाणाच्या, सोनीपत आणि युपीच्या रायबरेलीच्या कारखान्यात सेमी हायस्पीड वंदेभारत ट्रेनच्या डब्यांची बांधणी केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधानाच्या दूरदृष्टीने मेक इन इंडीया मोहीमेंतर्गत तयार केलेल्या आलिशान वंदेभारत एक्सप्रेस प्रवाशांना पसंद पडत आहेत. चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यासह महाराष्ट्रातील लातूर आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि हरीयाणातील सोनिपत येथील रेल्वेच्या कारखान्यात वंदेभारतच्या कोचची निर्मिती केली जाईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. वंदेभारतला देशाच्या कानाकोपऱ्यांना वंदेभारतने जोडण्याचे पंतप्रधानांचे महत्वाकांक्षी स्वप्न आम्ही पूर्ण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

देशभरातील 1278 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकासाची व्यापक मोहीम रेल्वेने हाती घेतली आहे, या स्थानकांच्या विकासाचे तीन गट करण्यात आले आहेत. नवीन दिल्ली, अहमदाबाद, कानपूर, लखनऊ आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस यासारख्या मोठ्या स्थानकांचा, पुरी, जोधपूर, गांधीनगर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस यासारख्या मध्यम आणि लहान अशा देशभरातील एकूण 1278  रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले.

2009-14 :  वार्षिक सरासरी 10,623  कोटी रूपयांची आर्थिक तरतूद

2014-19 : वार्षिक सरासरी 24,347  कोटी रूपयांची आर्थिक तरतूद

2022-23 :  77,271 कोटी रूपयांची आर्थिक तरतूद

2023-24 : ₹ 2,40,000 कोटी रूपयांची आर्थिक तरतूद

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?