AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2023 : रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांच्या सवलतीचे काय होणार ? कोरोनाकाळात बंद केलेल्या या सवलतीबद्दल काहीच उल्लेख नसल्याने नाराजी

रेल्वेच्या प्रवास सवलतीवर 2019-20 मध्ये 59,837 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरीकांना प्रवासी सवलत पुन्हा बहाल होणार का ? या विषयी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव काय निर्णय घेतात याकडे नजर लागली आहे.

Budget 2023 : रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांच्या सवलतीचे काय होणार ? कोरोनाकाळात बंद केलेल्या या सवलतीबद्दल काहीच उल्लेख नसल्याने नाराजी
BUDGETImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 01, 2023 | 3:27 PM
Share

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाचे जनरल बजेट  ( BUDGET )  सादर करताना रेल्वे अर्थसंकल्पाबद्दल केवळ एका ओळीत उल्लेख केला आहे. रेल्वेसाठी 2.40 लाख कोटीची तरतूद केल्याचे सितारामन यांनी म्हटले आहे. परंतू रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरीकांना ( senior citizens ) असलेल्या प्रवासातील सवलती विषयी बजेटमध्ये काहीही उल्लेख केला नसल्याने ही कोरोनाकाळात बंद केलेली ही सवलत पुन्हा कधी बहाल करण्यात येणार का ? असा सवाल ज्येष्ठ नागरीक करीत आहेत.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ( senior citizens ) रेल्वे प्रवासात सवलत दिली जाते. कॅन्सर सारखे दुर्धर आजार, तसेच विद्यार्थी, अधिस्वीकृती पत्रकार आदी विविध वर्गवारीतील नागरीकांना रेल्वे प्रवासात सवलत देत असते. कोरोना साथ पसरल्याने मार्च 2021  टाळेबंदी जाहीर केल्यानंतर रेल्वेसह सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर कोरोनाची साथ कमी झाल्यानंतर हे निर्बंध हळूहळू उठविण्यात आले. रेल्वेने आपली सेवा पूर्ववत केली असली तरी ज्येष्ठांसह अनेक कॅटगरीची सवलत अद्याप पूर्ववत केलेली नाही. त्यामुळे ही सवलत कधी बहाल होणार असा सवाल ज्येष्ठ नागरीक बळीराम राणे यांनी टीव्ही नाईन मराठीशी बोलताना केला आहे.

लवकरच ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा प्रवास सवलत मिळणार का

कोरोना काळात बंद केलेली ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाची सवलत सुरू करण्यास केंद्र सरकारने नकार दिला होता. त्यामुळे ज्येष्ठ नागरीक नाराज झाले आहेत.  ही सिनियर सिटीझन सवलत पुन्हा सुरू होऊ शकते का ? या विषयी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) काय निर्णय घेतात याकडे नजर लागली आहे.

रेल्वे मंत्रालय लवकरच ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीसाठीचे पात्रता मापदंड बदलणार असल्याचे म्हटले जात होते. रेल्वे बोर्ड ज्येष्ठ नागरिकांना द्यावयाच्या सवलतीचे निकष बदलणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. त्यात काही श्रेणीसाठी रेल्वे तिकिटात ही सवलत मिळणार असल्याचे म्हटले होते.

पूर्वी सर्व श्रेणीसाठी रेल्वे तिकिटात सवलत देण्यात येत होती. ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याविषयीची योजना तयार करण्यात होत असल्याचे म्हटले जात होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सरसकट न देता काही अटी घालण्यात येणार आहेत. पण अद्याप याविषयीचे नियम आणि शर्ती जाहीर करण्यात आलेल्या नसल्याचे म्हटले जात आहे.

रेल्वे मंत्रालयाने (Ministry Of Railways) दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रेल्वेच्या भाड्यात 53 टक्के सवलत देण्यात येते. यासोबतच दिव्यांग, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी प्रवास भाड्यात सवलत देण्यात येते.  रेल्वेमंत्री वैष्णव यांनी रेल्वे प्रवासावर सवलत मिळण्याबाबतच्या प्रश्नावर लोकसभेत ही माहिती दिली होती. रेल्वे तिकिटावर सवलत देण्यात येणार आहे. 2019-20 मध्ये रेल्वेच्या प्रवास सवलतीवर 59,837 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

कोरोनाकाळापूर्वी रेल्वे प्रवासात अशी मिळायची सवलत

कोरोना साथीपूर्वी रेल्वे 58 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिला आणि 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुष प्रवाशांना प्रवासी सवलत देत होती. 22 मार्च 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत 37 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला आहे. रेल्वे प्रवास सवलतीसाठी महिलांचे पात्रता वय किमान वय 58 आहे, तर पुरुषांसाठी ते 60 आहे. पूर्वी 50% सवलत मिळायची नंतर  40% सवलत देण्यास सुरूवात झाली होती.

रेल्वे प्रवासी सेवेसाठी रेल्वे 59,000 कोटी रुपयांची सबसिडी देत आहे, जी अनेक राज्यांच्या वार्षिक बजेटपेक्षा मोठी आहे. त्याच वेळी, रेल्वेचे वार्षिक पेन्शन बिल सुमारे 60,000 कोटी रुपये आहे. याशिवाय पगाराचे बिल 97 हजार कोटी रुपये आहे, तर 40 हजार कोटी रुपये इंधनावर खर्च होत आहेत.

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना