ज्ञानेश कुमारांविरोधात जेलभरो, पण भाषणात आयोगाचा मुद्दाच नाही; दिपके मोदी-फडणवीसांवरच बरसले

Abhijit Dipke News: कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनात मुख्य मुद्दा निवडणूक आयोगाचा होता. मात्र अभिजीत दिपकेंच्या भाषणाचा रोख मात्र मोदी-शाह-फडणवीसांकडेच पाहायला मिळाला.

ज्ञानेश कुमारांविरोधात जेलभरो, पण भाषणात आयोगाचा मुद्दाच नाही; दिपके मोदी-फडणवीसांवरच बरसले
| Updated on: Oct 02, 2026 | 7:02 PM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पक्षाने मुंबईतील शिवाजी पार्कवर आज आंदोलन पुकारले होते. यात सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी आंदोलकांसोबत संवाद साधला आहे. त्यांनी भाषणात मुंबई पोलिसांचे कौतुक केले. यानंतर त्यांनी दिल्ली पोलीस, अमित शाह, नरेंद्र मोदी, आणि आरएसएसवर टीका केली. मात्र जो महत्त्वाचा मुद्दा होता, ज्यासाठी त्यांनी आंदोलन पुकारले आहे, त्याबाबत काही बोलले नाही. ते पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्‍यांवर टीका करण्यात व्यस्त होते. पण सुरूवातीलाच निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमारांवर काही टीका केली नाही. ते महत्त्वाचा मुद्दा सोडून टीका करण्यात व्यस्त असल्याचे दिसले. यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

कॉकरोच जनता पक्षाने ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन पुकारले होते. पण अभिजीत दिपकेंनी भाषणात त्यांच्यावरच टीका केली नाही. या भाषणात अभिजीत दिपकेंचा भर अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर जास्त दिसला. यामुळे आता अभिजीत दिपकेंनी जेलभरो आंदोलनाचा मुख्य मुद्दा सोडला का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Loading...

यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत शिवाजी पार्कमध्ये जमलेल्या आंदोलकांना तुरुंगात पाठवण्याचे आव्हान अभिजीत दीपके यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. तसेच अभिजित दीपकेंनी शिवाजी पार्कमध्ये समर्थकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशाने जगभर दौरे करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, मोदींना त्यांची फॅशन सेन्स आणि जगदौरे याशिवाय काहीही माहीत नाही.

मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये समर्थकांना संबोधित करताना सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके म्हणाले की, गांधी हे देशाचा आत्मा आहेत. गांधींच्या विचारधारेमुळेच देश स्थिर राहिला आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. महात्मा गांधी आणि डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या प्रभावावर प्रकाश टाकत ते पुढे म्हणाले, गांधी आत्मा आहेत, तर आंबेडकर भारताचा कणा आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us