CJP च्या आंदोलनासाठी मुंबईत आले, छातीत दुखू लागलं अन्… व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

CJP Protest Man Dies: शिवाजी पार्कात CJP चं आंदोलन पाहण्यासाठी आले होते. पण हृदयविकाराच्या झटक्याने ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

CJP च्या आंदोलनासाठी मुंबईत आले, छातीत दुखू लागलं अन्... व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
| Updated on: Oct 02, 2026 | 10:24 PM

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आंदोलन केले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. चित्रपट अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींनी मंचावर येऊन आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला. मात्र अशातच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.

कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तो व्यक्ती आंदोलनात सहभाग घेण्यासाठी गेला होता. मात्र तिथेच त्याला काळानं गाठलं आहे. त्या व्यक्तीविषयी माहिती आता समोर आली आहे. तसेच त्याच्या मृत्यूचे कारणही समोर आले आहे.

Loading...

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील ‘दोस्ती वेस्ट काउंटी’ येथे राहणारे ७५ वर्षीय गोपालकृष्ण सुब्बय्या पिल्लई हे आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिवाजी पार्क येथे ‘सीजेपी’द्वारे आयोजित आंदोलन पाहण्यासाठी आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांनी छातीत दुखू लागल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचे मित्र आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी शिवाजी पार्क येथील ‘शुश्रूषा हॉस्पिटल’मध्ये नेण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या आकस्मित मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंब आणि परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी मुंबईतील आंदोलनादरम्यान सहकार्य केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे आभार मानले.

मुंबई पोलिसांच्या वागणुकीचे कौतुक करताना त्यांनी दिल्ली पोलिसांवर टीकाही केली. ते म्हणाले की, दिल्ली पोलिसांनो, मुंबई पोलिसांकडून काहीतरी शिका. आम्हाला अटक करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना वरून देण्यात आले होते, पण मुंबई पोलीस इतके चांगले आहेत की त्यांनी आम्हाला अटक केली नाही. त्यांनी फक्त आम्हाला चहा दिला आणि निघून जाण्यास सांगितले. मुंबई पोलिसांनीही म्हटले, “साहेब, तुम्ही जे करत आहात ते अगदी योग्य आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us