शिंदेंच्या पहिल्या यादीमध्ये श्रीकांत शिंदेंचं नाव नाही, गोविंदाच्या तिकीटाच्या चर्चाही हवेत

लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या यादीमध्ये एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. त्यासोबतच दोन ते तीन असे मतदारसंघ आहे जिथल्या नावांचा तिढा काही सुटलेला दिसत नाहीये.

शिंदेंच्या पहिल्या यादीमध्ये श्रीकांत शिंदेंचं नाव नाही, गोविंदाच्या तिकीटाच्या चर्चाही हवेत
CM Eknath Shinde Shrikant Shinde
Harish Malusare | Updated on: Mar 28, 2024 | 7:58 PM

लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये आठ जागांवरील उमेदलवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंंदे यांचे नाव पहिल्या यादीमध्ये नाही. श्रीकांत शिंदे यांचं नाव पहिल्या यादीमध्ये नसल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. श्रीकांत शिंदेंसह आणखी काही अशा जागा आहेत जिथे अद्याप उमेदवारांची घोषणा केली गेली नाही.

पहिल्या यादीमध्ये नाशिक, कल्याण-डोंबिवली आणि यवतमाळ-वाशिम या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीत. या जागांवरचा तिढा कायम असल्याचं दिसत आहे त्यामुळे या जागांवर उमेदवाराची घोषणा केली गेली नसावी. तर मावळमधून श्रीरंग बारणे यांना परत एकदा उमेदवारी  देण्यात आली आहे.

या आठ जागांवर शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हिंगोलीतून हेमंत पाटील, बुलडाणातून प्रतापराव जाधव, शिर्डीत सदाशिव लोखंडे, दक्षिण मुंबईतून राहुल शेवाळे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीमध्ये पहिल्या यादीमधील आठ जागांवरील सात जागांवर विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहेय तर राहुल शेवाळे यांना दक्षिण मुंबईतून संधी मिळाली आहे.

गोविंदाच्या उमेदवारीची चर्चा हवेतच

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याने दुपारी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे गोविंदालाही तिकीट मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र पहिल्या यादीमध्ये त्याच्या नावााचा समावेश नसल्याने ती चर्चा हवेतच विरल्याचं दिसत आहे. उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्याला संधी देणार असल्याची चर्चा होत आहे.

Follow Us