CM Uddhav Thackeray Live | 17 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, पुढे काय होणार?, मुख्यमंत्री म्हणतात…

| Updated on: May 08, 2020 | 8:48 PM

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (8 मे) लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. | CM Uddhav Thackeray Live

CM Uddhav Thackeray Live | 17 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, पुढे काय होणार?, मुख्यमंत्री म्हणतात...
Follow us on

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून (CM Uddhav Thackeray Live) जनतेशी संवाद साधला. औरंगाबादमध्ये (Aurangabad Train Mishap) रेल्वेने मजुरांना चिरडलेली घटना अत्यंत वेदनादायी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दुसरीकडे लॉकडाऊन कधीपर्यंत ठेवायचा हे जनतेच्या हातात आहे, मुंबईत लष्कराची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं. (CM Uddhav Thackeray Live)

औरंगाबाद-जालनाजवळ मजुरांची झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. मजुरांनी संयम बाळगावा, आम्ही राज्यांशी संपर्क करुन ट्रेन सुरु करत आहोत, हळूहळू मजुरांना पाठवू, पण संयम ठेवा.  औरंगाबादच्या घटनेने व्यथित झालो, घरी जायला निघालेल्या मजुरांचे मृत्यू दुर्दैवी आहेत. मजुरांनी अफवांना बळी पडू नये, ट्रेन सुरु होत आहेत म्हणून कुठेही जाऊ नका, ज्या मजुरांचा अपघात झाला ते भुसावळकडे जात होते, रेल्वेट्रॅकवरुन चालत जात होते आणि त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

17 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, पुढे काय होणार?

लॉकडाऊन हा गतीरोधक आहे. आपण कोरोनाची गती रोखण्यात यश मिळवलं आहे, पण आपल्याला त्याची साखळी तोडण्यात यश मिळालं नाही. ती साखळी तोडल्याशिवाय शांत राहायचं नाही. लॉकडाऊनचं काय होणार, 17 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, पुढे काय होणार? किती दिवस वाढत राहणार, म्हणून आपला असा प्रयत्न हवा की एकदाच आपण कडक बंधनं पाळूया, आणि या विषाणूचा संसर्ग, प्रसार कायमचा संपवूया, त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

LIVE UPDATE :

  • आपल्याला सामाजिक अंतर ठेवायचं नाही, तर शारिरीक अंतर ठेवायचं आहे, म्हणूनच मी फिजीकल डिस्टन्सिंग हा शब्द वापरला : मुख्यमंत्री
  • लॉकडाऊन वाढवण्यात कुणाला रस नाही, पण प्रत्येकाने शिस्त राखणं आवश्यक आहे, माझा प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे – मुख्यमंत्री
  • डॉक्टरांची मोठी गरज, आयुषच्या डॉक्टरांनाही या कामात सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे, आयुर्वेदीक डॉक्टरांनीही सहभागी व्हावं : मुख्यमंत्री
  • मी आयुष डॉक्टरांनाही आवाहन करतोय, त्यांनी मदतीसाठी पुढे यावं, तुम्ही सर्वांची महाराष्ट्राला गरज आहे – मुख्यमंत्री
  • रुग्णालयांमध्ये गलथानपणा चालणार नाही, आमच्यावर कारवाईची वेळ आणू नका, सर्व व्यवस्थित असताना गलथानपणा चालणार नाही : मुख्यमंत्री
    राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहेच, पण बरे होणाऱ्यांचंही प्रमाण अधिक आहे, सव्वातीन हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले – मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray Live)
  • कोरोनाची साखळी तोडण्याची वेळ आहे, अनेक रुग्ण उशिराने समोर येत आहेत, त्यामुळे सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं असतील तर स्वतःहून पुढे येऊन तपासणी करा, घाबरु नका : मुख्यमंत्री
  • मुंबईतील टेस्ट सुरुच राहतील, राज्यात सर्वाधिक टेस्ट होत आहेत, शेवटच्या टप्प्यात रुग्ण आल्यावर उपाय कमी पडतात – मुख्यमंत्री
  • पोलिसांना विश्रांती देण्यासाठी केंद्राकडून अधिकच्या मनुष्यबळाची मागणी करणार, नंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने पोलिसांना तैनात करु, याचा अर्थ लष्कर बोलावलं असा नाही : मुख्यमंत्री
  • लॉकडाऊन कितीवेळा वाढवायचा? आपल्याला चेन तोडण्यात यश आलेलं नाही, ते यश मिळवायचं आहे – मुख्यमंत्री
  • बाहेरच्या राज्यातील आपल्या लोकांना आणणार आहोत, पण सर्व काही मोजून मापून करणार आहोत, रेड झोन, कंटेन्मेंट झोनमध्ये अजूनही केसेस सापडत आहेत, तिथे शिथिलता इतक्यात शक्य नाही, लॉकडाऊन हा गतीरोधक आहे, पण चेन तोडायला अद्याप यश नाही – मुख्यमंत्री
  • सर्व यंत्रणा तणावाखाली आहेत, पोलीस यंत्रणेतील अनेकजण आजारी पडले, काहींचा मृत्यू झाला, त्यांना विश्रांती देण्याची गरज आहे, म्हणून तोपर्यंत केंद्र सरकारने अधिकचं मनुष्यबळ द्यावं : मुख्यमंत्री
  • संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे, सर्व उपाययोजना करत आहोत, बीकेसीमध्ये कोव्हिड रुग्णालय उभं राहात आहे, ते दुपटीने वाढवू, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करु – मुख्यमंत्री
  • मजुरांनी काळजी करु नये, तुमच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून तुमच्या घरी जाण्याची व्यवस्था करत आहोत, संयम ठेवा : मुख्यमंत्री
  • अफवांना बळी पडू नका, ट्रेन सुरु होत आहेत म्हणून कुठेही जाऊ नका, ज्या मजुरांचा अपघात झाला ते भुसावळकडे जात होते, रेल्वेट्रॅकवरुन चालत जात होते आणि त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला – मुख्यमंत्री
  • औरंगाबाद-जालनाजवळ मजुरांची झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी, मजुरांनी संयम बाळगावा, आम्ही राज्यांशी संपर्क करुन ट्रेन सुरु करत आहोत, हळूहळू मजुरांना पाठवू, पण संयम ठेवा – मुख्यमंत्री
  • औरंगाबादच्या घटनेने व्यथित, घरी जायला निघालेल्या मजुरांचे मृत्यू दुर्दैवी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray Live