आर्यन खानच्या सुनावणी दरम्यान कोर्टात वकिलांचीच गर्दी अन् गोंधळ, न्यायाधीश उठले; सर्वांनाच बाहेर काढलं

| Updated on: Oct 26, 2021 | 5:05 PM

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज दुपारी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. त्यावेळी उच्च न्यायालयात अचानक वकिलांनी प्रचंड गर्दी केली. (Conspiracy charge doesn't apply in Aryan's case, argues Mukul Rohatgi)

आर्यन खानच्या सुनावणी दरम्यान कोर्टात वकिलांचीच गर्दी अन् गोंधळ, न्यायाधीश उठले; सर्वांनाच बाहेर काढलं
Aryan Khan
Follow us on

मुंबई: आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज दुपारी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. त्यावेळी उच्च न्यायालयात अचानक वकिलांनी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. न्यायाधीशांना काम करणंही अडचणीचं झालं. त्यामुळे न्यायाधीश आपल्या आसनावरून उठले. त्यानंतर या वकिलांना आणि ज्यांचा प्रकरणाशी संबंध नाही अशा लोकांना बाहेर काढण्यात आलं. या सर्व गोंधळात पंधरा मिनिटं गेली. त्यानंतर पुन्हा सुनावणीस सुरुवात झाली.

सेशन्स कोर्टातही दिलासा न मिळाल्याने आर्यन खानच्या वकिलांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खानच्या जामीनावर आज सुनावणी होणार असल्यानं संपूर्ण मीडियाचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. त्यामुळे मीडियाचे प्रतिनिधी दुपारीच कोर्टात हजर झाले होते. त्याचबरोबर उच्च न्यायालयातील वकीलही युक्तिवाद ऐकण्यासाठी कोर्टात हजर झाले. एक एक करत अनेक वकील कोर्ट रुममध्ये आल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे कामकाज करणं कठिण झालं. न्यायामूर्ती नितीन सांब्रे यांनी हा गोंधळ पाहून ते आपल्या न्यायासनावरून उठले. न्यायालयात झालेल्या गर्दीवर न्यायाधीश सांबरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी गर्दी कमी करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आवारातील गर्दी पांगवण्यासाठी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवण्याचे सांगितले आहे. त्यानंतर कोर्टातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ सर्व वकिलांना बाहेर काढलं. तसेच ज्यांचा या खटल्याशी संबंध नाही अशा लोकांनाही बाहेर काढलं. या सर्व प्रकारात 15 मिनिटाचा वेळ गेला. कोर्टातील गर्दी कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा सुनावणीस सुरुवात झाली. तसेच मीडिया आणि प्रकरणाशी संबंधितांनाच कोर्टात प्रवेश देण्यात आला आहे.

रोहतगींचा जोरदार युक्तिवाद

दरम्यान, यावेळी ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी आर्यन खानच्या बाजूने जोरदार युक्तीवाद केला. बाहेर असलेल्या गर्दीमुळे मी माफी मागतो. मी आर्यन खानची बाजू मांडत आहे. तो फक्त तेवीस वर्षाचा असून कॅलिफोर्निया येथून त्याने पदवीचे शिक्षण घेतले आहे. मार्च 2020 मध्ये तो परत भारतात आला आहे. हे प्रकरण 2 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. आर्यन हा ग्राहक नव्हता. विशेष पाहुणा म्हणून त्याला आमंत्रित करण्यात आले होते. इव्हेंट मॅनेजर असलेल्या प्रतीक गाबा नावाच्या माणसाने त्याला बोलावलं होतं, असा दावा रोहतगी यांनी यावेळी केला.

चॅटिंगचा क्रूझ पार्टीशी संबंध नाही

आर्यनविरोधात कट रचला जातोय. आर्यन अरबाजसोबत आला. आर्यनला अरबाजकडे असलेल्या गोष्टींची माहिती असल्याचा दावा केला जातोय. कोणाच्यातरी बुटामध्ये काय आहे, त्याच्याशी आर्यनचा काही संबंध नाही, असा दावा करतानाच आर्यनची व्हॉट्सअ‌ॅप चॅटिंग बाहेर काढण्यात आली. ही चॅटिंग रेकॉर्डवर नाही. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या चॅटिंगचा क्रूझ पार्टीशी संबंध नाही, असा दावाही रोहतगी यांनी केला.

 

संबंधित बातम्या:

मीडियात पब्लिसिटी स्टंट करू नका, पुरावे असतील तर कोर्टात जा; यास्मिन वानखेडेंचं नवाब मलिक यांना आव्हान

समीर वानखेडेंची चौकशी, साक्षीदाराचे आरोप; ज्येष्ठ वकील उज्जवल निकम म्हणतात…

VIDEO: नवाब मलिक ड्रग्ज लॉबीचे प्रवक्ते, जावयाला अटक केल्यानेच थयथयाट; यास्मिन वानखेडे यांचा घणाघाती हल्ला

(Conspiracy charge doesn’t apply in Aryan’s case, argues Mukul Rohatgi)