मीडियात पब्लिसिटी स्टंट करू नका, पुरावे असतील तर कोर्टात जा; यास्मिन वानखेडेंचं नवाब मलिक यांना आव्हान

यास्मिन वानखेडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिल. ( Who's Nawab Malik to look for a bureaucrat's birth certificate?, ask yasmin wankhede)

मीडियात पब्लिसिटी स्टंट करू नका, पुरावे असतील तर कोर्टात जा; यास्मिन वानखेडेंचं नवाब मलिक यांना आव्हान
yasmin wankhede
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 2:36 PM

मुंबई: मीडिया समोर येऊन पब्लिसिटी स्टंट करू नका. तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा. आपला वेळ वाया घालवू नका. आम्ही तिथे तुम्हाला उत्तर देऊ, असं आव्हानच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना दिले.

यास्मिन वानखेडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिल. मलिक आदरणीय मंत्री आहेत. पण त्यांना हे शोभत नाही. ते चुकीची माहिती देत आहेत. तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा. मीडियाला बोलवून केवळ प्रसिद्धी घेऊ नका. तुमचा वेळही वाया घालवू नका, असं यास्मिन वानखेडे यांनी सांगितलं.

मलिक यांचे बोलविते धनी कोण?

ड्रग्ज लॉबीच्या सांगण्यावरूनच मलिक आरोप करत असल्याचा दावाही त्यांनी केला. मलिक यांच्यामागे ड्रग्ज लॉबी असणार. त्यांना पैसे देऊन आरोप करायला लावत असतील. ड्रग्ज लॉबींनी त्यांना प्रवक्ते म्हणून नेमले असावे. त्यांच्या जवायाला अटक केली होती. त्यामुळेच ते आरोप करत असावेत, असा दावाही त्यांनी केला.

आमचं सर्टिफिकेट शोधणारे तुम्ही कोण?

समीर वानखेडे यांचं बर्थ सर्टिफिकेट नेटवर मिळत नसल्याचं मलिक यांनी सांगितलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनाच बर्थ सर्टिफिकेट मिळत नाही. ते बर्थ सर्टिफिकेट का शोधत आहेत? त्यांची रिसर्च टीम आहे ना? मुंबईतील पोस्ट केलेला फोटो दुबईतील दाखवतात. मग त्यांनी शोधावं सर्टिफिकेट, असं सांगतानाच आमचं बर्थ सर्टिफिकेट शोधण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही कोण आहात? एखाद्या नोकरशहाचं सर्टिफिकेट काढण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुमचं सर्टिफिकेट कुणी काढलं आहे का? असा सवाल त्यांनी केला.

पोलिसात तक्रार नोंदवणार

आम्हाला धमक्या येत आहेत. भीतीही वाटत आहे. आमचं काम काय आहे? तरीही आम्हाला तुमच्याशी बोलावं लागत आहे. आम्ही काम करणाऱ्या महिला आहोत. आम्हाला धमक्या आणि जीवे मारण्याचे फोन येत आहे. कापण्याचे कॉल येत आहेत. मला वाटतं आता आम्हीही रोज खोटे पुरावे देऊन पीसी घ्यायला हवी, असा टोलाही त्यांनी लगावला. धमक्या येत असल्याने पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. समीर वानखेडे या सर्व प्रकरणातून बाहेर पडतील. सत्यमेव जयते होईलच. ते बाहेर पडतील. नेहमीच सत्याचा विजय होतो. तो होईलच, असंही त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

‘इंटरव्हलनंतर राऊत बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार’, नितेश राणेंचा शिवसेनेला थेट इशारा

जाळून टाकू, मारून टाकू, लटकवून टाकू अशा धमक्या येत आहेत, आमच्या जीवाला धोका; क्रांती रेडकरचा दावा

Special 26, समीर वानखेडे आणखी गोत्यात? मलिकांनी 26 प्रकरणं जाहीर केली, कारवाई होणार?; वाचा निनावी पत्रं जसच्या तसं!

( Who’s Nawab Malik to look for a bureaucrat’s birth certificate?, ask yasmin wankhede)

Non Stop LIVE Update
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.