Saamana : …आणि लालपरी मुक्त झाली! गाढवाचे काय ? सामना अग्रलेखातून गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती टीका

"डंके की चोट पर हा सदावर्तेचा (Gunratna Sadavarte) परवलीचा शब्द होता. आज सदावर्तेची वरात या न्यायालयातून त्या न्यायालयात, या पोलिस स्टेशनमधून (Police Station) त्या पोलिस स्टेशनमध्ये सुरू आहे. सदावर्तेला गाढवांची आवड होती. त्याने गाढव पाळले, पण या महान गाढवाप्रेमींना कोण पाळत होते हे सुध्दा लोकांसमोर यायलाच हवे. कायदा हा सामान्यांची कवचकुंडले असतो.

Saamana : ...आणि लालपरी मुक्त झाली! गाढवाचे काय ? सामना अग्रलेखातून गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती टीका
सामना अग्रलेखातून गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती टीका Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 7:09 AM

मुंबई – “डंके की चोट पर हा सदावर्तेचा (Gunratna Sadavarte) परवलीचा शब्द होता. आज सदावर्तेची वरात या न्यायालयातून त्या न्यायालयात, या पोलिस स्टेशनमधून (Police Station) त्या पोलिस स्टेशनमध्ये सुरू आहे. सदावर्तेला गाढवांची आवड होती. त्याने गाढव पाळले, पण या महान गाढवाप्रेमींना कोण पाळत होते हे सुध्दा लोकांसमोर यायलाच हवे. कायदा हा सामान्यांची कवचकुंडले असतो. सदावर्तेसारखे लोक कायदा आणि संविधानाचा गैरवापर करतात व सामान्यांना देशोधडीस लावतात. कायदा गाढव असतो अशा अर्थाची एक म्हण आहे. सदावर्तेसारखे लोक गाढवच आपल्या दारात बांधतात व मुक्या मेंढरासारखी जनता त्या गाढवाची पूजा करते. गाढव तुरूंगात जाताच लाल परी मुक्त झाली, गावागावांत धावू लागली.” अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील जनतेला या सर्वांची शिसारी आली होती

सदावर्तेंच्या झुंडशाहीला चार महीने आधीचं लगाम लावला असता तर एसटीचा संप एवढा चिघळला नसता. सदावर्तेला श्री शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याची दुर्बुध्दी आठवली नसती. तर हातात कायद्याचे पुस्तक घेऊन या माणसाने सामान्यांचा छळवाद सुरूचं ठेवला असता. ग्रामीण भागातील जनतेला या सर्वांची शिसारी आली होती. पण करणार काय हा प्रश्न होता. हातात कायद्याचे पुस्तक नाचवतं अंगात वकिलीचा काळा डगला चढवून या महाशयाने राज्यात जो कायद्याचा खेळ चालवला होता. तो खेळ शेवटी कायद्यानेच संपवला असं देखील सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सदावर्ते यांच्या घरात पोलिसांना एक पैसे मोजण्याची मशीन मिळाली आहे

सदावर्ते त्याच्या कर्माची फळ सध्या भोगत आहे. अनेक जिल्ह्यात त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या महाशयाची गावभर वरात काढली जात असल्याचं चित्र आहे. पण सदावर्ते यांची वरात काढल्यापासून एसटी मात्र सुसाट निघाली आहे. आता 75 हजार कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. सदावर्ते आणि त्याच्या माफिया टोळीने कर्मचाऱ्यांकडून लाखो रूपये गोळा केले आहेत. लाखो रूपये गोळा करून कामगारांना देशोधडीस लावण्याचे काम सदावर्ते यांनी केले आहे. सदावर्ते यांच्या घरात पोलिसांना एक पैसे मोजण्याची मशीन मिळाली आहे. यांचा आता असा कोणता व्यवसाय होता, की यांना पैसे मोजायला मशीन लागत होती. असा सवाल देखील सामनातून उपस्थित केला आहे.

Pune Crime : लष्करातील निवृत्त कर्नलनं पत्नीवर गोळ्या झाडल्या, पत्नीची हत्या करुन स्वतःही जीव दिला

Red Fort : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरुन संबोधित करणार; भाजपसाठी ते महत्वाचंच! कारण…

…तर, महाराष्ट्रच नव्हे भारत अंधारात, निम्म्या उर्जा केंद्रात कोळशा स्टॉक डेंजर झोनमध्ये!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.